नारायण राणेंसाठी आज रत्नागिरीत शहांची सभा

नारायण राणेंसाठी आज रत्नागिरीत शहांची सभा

पान १
८११०८
८११०९

रत्नागिरीत आज शहांची सभा
स्वागताची जय्यत तयारी ः २० हजार खुर्च्यांसह मंडप उभारणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघांत तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे. महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी उद्या (ता. ३) केंद्रीय गृहमंत्री, भाजप नेते अमित शहा रत्नागिरीत येणार आहेत. दुपारी १२.३० वाजता गोगटे कॉलेजच्या जवाहर मैदानावर सभा होणार असून सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी जमेल, असा दावा स्थानिक नेत्यांनी केला. सभेची जय्यत तयारी झाली असून, महायुतीचे कार्यकर्ते रत्नागिरीत दाखल होणार आहेत. शहांच्या जंगी स्वागताची तयारी करण्यात येत आहे.
उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी अमित शहा यांची तोफ धडाडणार आहे. शहा सभेनिमित्त प्रथमच रत्नागिरीत येत आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी सभेकरिता नियोजन केले आहे. भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. राणे यांच्या प्रचारासाठी यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांची राजापूर येथे सभा झाली होती. आता शहांच्या सभेकरिता पूर्ण मैदानावर मंडप व्यवस्था करण्यात आल्याने उन्हाचा त्रास होणार नाही. पाण्याचीही व्यवस्था केली आहे. सभेला येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था १० ते १२ ठिकाणी केली आहे. महायुतीतील सर्व पक्षातले कार्यकर्ते पदाधिकारी नेतेमंडळी या सभेला उपस्थित राहणार आहेत. सहा विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने रत्नागिरीत दाखल होणार आहेत.
व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासमवेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार नीतेश राणे, आमदार शेखर निकम, नीलेश राणे आदी उपस्थित राहणार आहेत.
जिल्हाध्यक्ष राजेश सावंत पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, देशाचे गृहमंत्री अमित शहा रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या मतदारांचे आशीर्वाद मागण्यासाठी येणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बळ देण्याकरिता शहा येत असून, अशा या कणखर नेतृत्वाचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित राहावे. सभेची तयारी पूर्ण झाली आहे.’’

चौकट १
एलईडी स्क्रीनची सोय
सभेसाठी ३२ फूट बाय ५४ फुटांचे भव्य व्यासपीठ उभारले आहे. तब्बल २० हजार खुर्च्यांची व्यवस्था केली आहे. सर्वांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मोठ्या स्क्रिनवर सभा पाहता येणार आहे. सर्वत्र पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. आज दुपारपासून पोलिस पाहणी करत असून, सर्व परिसराची कसून तपासणी करण्यात येत होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com