भावांच्या खूनप्रकरणी धागेदोरे हाती

भावांच्या खूनप्रकरणी धागेदोरे हाती

पान १ साठी


नेपाळी सख्ख्या भावांच्या
खूनप्रकरणी धागेदोरे हाती
लवकरच उलगडा ः २० हून अधिक गुरख्यांची चौकशी
पावस, ता. २ ः रत्नागिरी तालुक्यातील गोळप-मुस्लिमवाडी येथे आंबा बागेतील दोन सख्ख्या भावांच्या खूनप्रकरणी २० हून अधिक गुरख्यांची कसून चौकशी केली. मंगळवारी खुनाची घटना समोर आल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील गुरख्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. अद्यापही पोलिसांना मारेकऱ्यांचा शोध लागला नसला तरी लवकरच खुनाचा उलगडा होईल. याप्रकरणी पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर खुनाचा तपास करत आहेत. भक्त बहाद्दुर थापा (७२) आणि खडक बहाद्दुर थापा (६५ रा. मूळ नेपाळ, सध्या आंबा बाग, गोळप) अशी दोन्ही मृत भावांची नावे आहेत.
गोळप ग्रामपंचायतीच्या हद्दीत मुस्लिम मोहल्ला येथील मुद्दसर मुकादम यांच्या हापूस आंबा कलमांच्या बागेमध्ये राखणीसाठी असलेल्या दोन नेपाळी सख्ख्या भावांचा खून झाल्याची घटना समोर आली होती. धारदार शस्त्राने वार करून दगडाने ठेचून चेहरा विद्रूप करण्यात आला होता. खुनाचा तपास करताना पोलिसांकडून सर्व शक्यतांची पडताळणी करण्यात येत आहे. मुकादम यांच्या बागेचा परिसर मोठा असल्याने त्याठिकाणी गुरख्यांची संख्यादेखील जास्त आहे. अशा स्थितीत या दोन भावांचे कुणाशी भांडण झाले होते. पैशांचा व्यवहार कुणाशी झाला होता का याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. दुसऱ्या कोणीतरी खून केला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. लवकरच गुन्हेगारांना पकडू, असे आश्‍वासन उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी दिले आहे. त्या दृष्टीने परिसरामध्ये पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्या वतीने गस्त घालण्याचे काम सुरू आहे व कोणी संशयित असल्यास त्याची चौकशी सुरू आहे.


गुरख्यांची माहिती पोलिसांना देणे अपेक्षित
या परिसरामध्ये हापूस आंब्याच्या कलमांच्या बागा मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने स्थानिक मजूर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे आंबा सीझनला बागायतदार नेपाळी लोकांना राखणीसाठी ठेवतात; परंतु पोलिसांच्या वतीने सर्व बागायतदारांनी आपल्याकडे ठेवण्यात येणाऱ्या गुरख्यांची माहिती पोलिस ठाण्याला देण्याचे आवाहन दरवर्षी केले जाते. परंतु, संबंधित बागायतरांकडून गुरख्यांची माहिती दिली जात नसल्यामुळे या भागामध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांच्या संदर्भात तपास करणे अडचणीचे ठरत आहे.


गोळप येथील सख्ख्या भावांच्या खूनप्रकरणाचा तपास सुरू असून, लवकरच या खुनातील संशयित आरोपींना गजाआड करू.
- धनंजय कुलकर्णी, जिल्हा पोलिस अधीक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com