दोडामार्ग माजी सभापतींचे नाव मतदार यादीतून गायब

दोडामार्ग माजी सभापतींचे नाव मतदार यादीतून गायब

swt241.jpg
81163
विशाखा देसाई

दोडामार्ग माजी सभापतींचे नाव
मतदार यादीतून गायब
कोलझरमधील केंद्रः प्रशासनाकडे तक्रार
सकाळ वृत्तसेवा 
दोडामार्ग, ता. २ः मतदार यादीतून नाव वगळण्यात आल्याने दोडामार्ग माजी पंचायत समिती सभापती विशाखा विलास नाईक यांनी आज निवडणूक शाखेत तक्रारी अर्ज दाखल केला आहे. कोणत्या कारणाने आपले नाव वगळण्यात आले याची सखोल चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी तसेच येत्या सात तारखेला होणाऱ्या मतदान प्रक्रियेत मला मतदानाचा हक्क बजाविण्यास द्यावे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
कोलझर गावाच्या नागरिक विशाखा देसाई या मतदान ओळखपत्र आल्यापासून त्या मतदानाचा हक्क बजावत आहेत. मात्र, या लोकसभा निवडणुकीत प्रशासनाने त्यांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
देसाई या २०१२ मध्ये दोडामार्ग पंचायत समितीवर निवडून आल्या होत्या. त्यांनी सभापती पद देखील भूषविले होते. मात्र, या लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादीत नाव नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यासंदर्भात त्यांनी तक्रार अर्ज घेऊन तहसील कार्यालय गाठले. मागील निवडणुकीत आपण मतदानाचा हक्क बजावला असताना देखील या लोकसभा निवडणुकीत आपले नाव कसे गायब झाले ? याबाबत त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना विचारणा केली. यावर निवडणूक अधिकारी स्तब्ध झाले अन् विधानसभा निवडणुकीत तुम्हाला मतदान करण्याची संधी देऊ, असे सुचविले. याला त्यांनी आक्षेप घेतला. तसेच अठरा वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक भारतीयाला मतदान करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. त्यामुळे मतदान करण्याची संधी देऊ म्हणजे काय? असा सवाल केला. संविधानाने मतदानाचा हक्क हिरावून घेण्याच्या कोणताही अधिकार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करून आपणास या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याची संधी मिळावी, अशी मागणी देसाई यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com