-लिंबूचे दर वाढल्याने सरबत 20 रुपये

-लिंबूचे दर वाढल्याने सरबत 20 रुपये

१४ (टूडे २ साठी, अँकर)

लिंबूचे दर वाढल्याने सामान्यांचे सरबतही महागले

ग्राहकांच्या खिशाला चाट; सात रुपयाला एक प्रमाणे विक्री

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० : लिंबाचे दर वाढल्यामुळे लिंबू सरबतही महागले आहे. २० ते २५ रुपयांना सरबत विकले जात असून, त्यातही नावापुरते लिंबू पिळले जात आहे. उन्हाच्या झळा शमविण्यासाठी नाइलाजाने ते नागरिक पीत आहेत.
चिपळूणमध्ये भाजीमंडईसमोर आणि पानगल्लीत घाऊकमध्ये लिंबूची विक्री होते. जुने बसस्थानक परिसरात विक्रेते सायकलवर लिंबूची विक्री करतात. भाजीमंडईसमोरील भाजीविक्रेतेही लिंबूची विक्री करतात. घाऊक बाजारात लिंबाचे दर दुपटीने वाढले आहेत तर किरकोळ बाजारात एक लिंबू सात रुपयांना विकले जात आहे. पुढील कालावधीत दर आणखी वधारण्याची शक्यता आहे. ऐन उन्हाळ्यात लिंबाचे दर महागल्याने नाराजी व्यक्त होत आहे. सकाळी दहा वाजल्यापासून उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. यामुळे घराबाहेर पडलेल्यांना थंडावा मिळण्यासाठी या काळात लिंबू सरबतला मागणी वाढत असते; मात्र, लिंबाचे दर वाढल्याने सरबतही महागले आहे. पाच ते दहा रुपयांना मिळणारे सरबत आता २० ते २५ रुपयांना विकले जात आहे. विशेष म्हणजे ग्लासभर पाण्यात चवीपुरते लिंबू पिळले जात आहे. थंडपेय घातक असल्याने लोक या काळात लिंबाचे सरबत पितात; मात्र, लिंबाचे दर वाढल्याने सरबतही महागले आहे. तो आता ग्राहकांना परवडत नाही. त्यामुळे दही किंवा ताकाला पसंती दिली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून लिंबाच्या दरात वाढ होत आहे. सद्य:स्थितीत आवक घटली आहे. त्यामुळे मागणी वाढली आहे. यापुढील काळात लिंबाचे दर वाढण्याची शक्यता आहे.
..............
कोट

लिंबू महागल्याने सध्या जेवणात कमी वापर करतो; परंतु लिंबाच्या तुलनेत आंबट म्हणून दह्याचा वापर करतो. त्यामुळे दही खाणे फायदेशीर वाटते.

- राजश्री काणे, गृहिणी.
---------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com