रायगडमध्ये दोन्ही उमेदवारांची धाकधूक

रायगडमध्ये दोन्ही उमेदवारांची धाकधूक

१७ (टूडे २ साठी, मेन)

रायगडमध्ये दोन्ही उमेदवारांची धाकधूक

मतदानाचा टक्का घसरला ; कुणबी फॅक्टरची चर्चा

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० : लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यावर्षीही मतदानाची टक्केवारी जवळपास कायम राहिली आहे. त्यामुळे सुनील तटकरे यांना रोखण्याचा अनंत गीते यांचा प्लॅन कितपत यशस्वी झाला, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
यावर्षी या लोकसभा मतदार संघात ६०.५१ टक्के मतदान झाले आहे. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ६१.७७ टक्के इतके मतदान झाले होते. त्यामुळे दोन्ही उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेल्या रायगडातून झालेली गद्दारी रायगडचा मावळा कदापि सहन करणार नाही, याच मुद्द्यावर अनंत गीते यांनी रान पेटवले होते तर सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांनी गेल्या दहा वर्षात कोणती कामे केली हे दाखवा, असे थेट आव्हान दिले होते. तटकरे यांना शेकापचे नसलेले पाठबळ, महाडमधून यंदा काँग्रेसची न मिळालेली साथ तसेच राज्यातील राजकीय भूकंपामुळे राष्ट्रवादीचा सत्तेतील सहभाग, त्यामुळे गद्दारीचा झालेला आरोप यामुळे सुनील तटकरे यांच्यासाठी ही निवडणूक सोपी दिसत नाही.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांची साथ तटकरे यांना मिळाली आहे. दापोली विधानसभा मतदार संघात यावर्षी मतदानाचा टक्का घसरला आहे. केवळ ५७.३७ टक्के मतदान दापोली मतदार संघात झाले आहे. त्यामुळे तटकरे यांना दापोली मतदार संघाची साथ या लोकसभा निवडणुकीत कितपत मिळाली आहे, याबाबत शंका आहे. आमदार भास्कर जाधव यांच्या गुहागर विधानसभा मतदार संघात केवळ ५६.४४ टक्के मतदान झाले आहे. मतदानाची आकडेवारी यावर्षी घसरली आहे. त्यामुळे दापोली व गुहागर या दोन्ही विधानसभा मतदार संघात कमी झालेले मतदान सुनील तटकरे व अनंत गीते यापैकी कोणासाठी गेमचेंजर ठरणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. रायगड लोकसभा मतदार संघ हा कुणबीबहुल मतदार संघ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे अनंत गीते यांना काही ठिकाणी समाजानेही मोठी साथ दिल्याची चर्चा आहे.
रायगड जिल्ह्यात पेण विधानसभा मतदार संघात या वेळी या मतदार संघात ६४.५१ टक्के मतदान झाले आहे. पेण विधानसभा मतदार संघ हा भाजपचे रवी पाटील यांच्या ताब्यात आहे; पण या ठिकाणी शेकापची ताकदही मोठी आहे. त्यामुळे या ठिकाणी अनंत गीते यांना रोखण्यात तटकरेंना फार मोठे यश मिळेल, असे दिसत नाही. कारण, हा विधानसभा मतदार संघ शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. रायगड जिल्ह्यात अलिबाग व पेण या दोन्ही विधानसभा मतदार संघात शेकापची ताकद आहे.
अलिबाग विधानसभा मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढली असून ६६.१७ टक्के इतके मतदान झाले आहे. या वेळी अलिबाग विधानसभा मतदार संघात अनंत गीते यांना रोखण्यात तटकरे यांना कितपत यश येते हे पहावे लागेल. या वेळेला शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांची साथ तटकरे यांना मिळाली आहे. या वेळेला या विधानसभा मतदार संघात केवळ ५७.५६ टक्के इतके मतदान झाले आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ हा सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच मतदार संघातून मंत्री आदिती तटकरे या आमदार आहेत.
---

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com