सुक्या मासळी विक्रीतून उलाढाल वाढणार

सुक्या मासळी विक्रीतून उलाढाल वाढणार

१५ (टूडे २ साठी)


- rat१०p५.jpg -
KOP२४M८२७१२
चिपळूण : काविळतळी येथे सुकी मासळी विक्रीसाठी आणण्यात आली आहे.

सुक्या मासळी विक्रीतून उलाढाल वाढणार

चिपळुणात मागणी ; पावसाळ्यापूर्वीची बेगमी

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० : तालुक्यात ओल्या मासळीबरोबर सुक्या मासळीला प्रंचड मागणी आहे. ग्रामीण भागातून अधिक मागणी येत असल्यामुळे यंदा सुक्या मासळी विक्रीमधून मोठी उलाढाल अपेक्षित आहे.
चिपळूणमध्ये गुहागरनाक्यात सुक्या मासळीची मोठी बाजारपेठ आहे. गुहागर दापोलीसह अलिबाग आणि मुंबईतून येथे सुकी मासळी आणली जाते. सावर्डे, खेर्डी, काविळतळी येथे होलसेल दरात ही काही व्यापारी सुकी मासळी विकतात. गुहागरसह दापोलीतील महिला टोपलीतून सुकी मासळी आणतात आणि घरोघरी विकतात. पावसाळी खरेदीसाठी एका कुटुंबाला लागेल इतकी अंदाजे चार ते पाच हजार रुपयाची सुकी मासळी विकत घेतली जाते. खेर्डी, सावर्डे, आरवली, मार्गताम्हाणेच्या आठवडा बाजारातही सुकी मासळीची विक्री केली जात आहे. उन्हाळी सुट्टीमध्ये गावी आलेले मुंबई-पुणेतील चाकरमानी परतीला जाण्यापूर्वी सुकी मासळी विकत घेत आहेत. त्यामुळे सुक्या मासळीची खरेदी-विक्री वाढली आहे. यातून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. बोंबील, जवळा, मांदेली, कोळंबीचे सोडे, कोळंबी, बांगडा, माकूल आणि आंबाड या माशांची आवक वाढली आहे. सुक्या कोलीमला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. चांगल्या दर्जाची सुकी मासळी ज्यादा दरात तर हलक्या प्रकारची कमी दरात विकली जात आहे.
दरम्यान, मासे उन्हात सुकवण्यापुर्वी मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवतात. त्यानंतर उन्हात सुकवले जातात. हे मासे बराच काळ टिकतात. प्रामुख्याने पावसाळी हंगामात मासे मिळत नाहीत. खवय्यांना हे सुकवलेले मासे प्रचंड आवडतात. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी मे महिन्यात नागरिक सुकी मासळी खरेदी करून घेतात.
.........

सुक्या मासळीचे दर

- सुकी माकळी ३५० ते ४५० रुपये किलो.
- वाकट्या ५०० ते ६०० रुपये किलो
- अंबाड ४०० ते ५०० रुपये किलो
- मांदेली ३०० रुपये किलो
- माकले ४०० ते ६०० रुपये किलो
- सुके बोंबील ४०० ते ५०० रुपये किलो
- कोळंबीचे सोडे १५०० ते १८०० रुपये किलो
................

कोट

दर आठवड्याला शुक्रवारी सायंकाळी किंवा शनिवारी सकाळी सुकी मासळी येते. आठवडाभर विक्रीसाठी पुरेल इतकी मासळी आणली जाते. त्यानंतर मागणीप्रमाणे पुन्हा ऑर्डर दिली जाते. पावसाळ्यात खाण्यासाठी अनेकजण मे महिन्यामध्ये सुकी मासळी जास्त विकत घेतात. त्यामुळे आता सुक्या मासळीला चांगली मागणी आहे. लोकांना मागणीप्रमाणे सुकी मासळी दिली जाते.

- करामत मिठागरी, मच्छीविक्रेते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com