उष्म्याचा हापूससह कलिंगडाला फटका

उष्म्याचा हापूससह कलिंगडाला फटका

३ (टूडे १ साठी, मेन)


- rat१०p४.jpg-
२४M८२७०९
संगमेश्‍वर ः उन्हामुळे कलिंगडाचे वेल सुकून गेले

उष्म्यामुळे हापूससह कलिंगडाला फटका

उत्पादन, दर्जावर परिणाम ; दरात मोठी घट, बागायतदारांना आर्थिक फटका

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १०ः कोकणातही उन्हाचा कडाका वाढला असून, त्याचा परिणाम आंबा पिकासह कलिंगडावर झालेला आहे. उन्हामुळे हापूस आंबा भाजला असून, साका तयार होत आहे तर कलिंगडाच्या आकारावर परिणाम झाला आहे. परिणामी, शेवटच्या टप्प्यातील उत्पादन घटणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात हापूसचे ७० हजार हेक्टरवर उत्पादन घेतले जाते. यंदा ४० टक्केहून अधिक आंबा उत्पादन फेब्रुवारी, मार्च महिन्यातच हाती आले होते. उर्वरित पीक टप्प्याटप्प्याने येत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उत्पादन कमी झाले असून, १५ मे नंतर शेवटच्या टप्प्यातील आंबाकाढणीला सुरवात होईल. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात कलमांना मोहोर आला होता. त्याचे जतन केल्यामुळे त्यामधील उत्पादन जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मिळत राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे. गेल्या काही दिवसात उष्मा लाट मोठ्या प्रमाणात येत आहे. रत्नागिरीत कातळावर ३८ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदवले गेले आहे. त्यामुळे या परिसरातील हापूस आंबा भाजून गळ झाली तसेच काढणी केलेल्या फळामध्ये साका तयार झाला होता. हे प्रमाण मोठ्या फळामध्ये सर्वाधिक आढळत असल्याचे आंबा बागायतदारांचे मत आहे. उन्हाचा परिणाम होऊ नये यासाठी सूर्याची प्रखरता जाणवणाऱ्‍या दिशेची फळं लवकर काढली जात आहेत उत्पादन खर्च वाढण्याच्या भीतीने आणि बाजारात दर स्थिर असल्यामुळे अनेक बागायतदार लालसर झालेला आंबा आधीच काढत आहेत. असा आंबा पिकला तर त्याच्या चवीवर आणि आकारावर परिणाम करतो.

दरम्यान, जिल्ह्यात सुमारे चारशेहून अधिक हेक्टरवर कलिंगड लागवड केली जाते. बहुसंख्य शेतकरी कलिंगडाची शेती व्यवसाय म्हणून करतात. ऑक्टोबर महिन्यात पहिल्या टप्प्यातील कलिंगड पिकामधून चांगले उत्पादन मिळाले; मात्र पुढे उन्हाचा परिणाम झाल्याचे शेतकऱ्‍यांकडून सांगण्यात आले. काहींच्या शेतामध्ये करपा रोगाने उभे पीक नष्ट झाले तर काही शेतकऱ्‍यांना अर्धेच उत्पादन मिळाले. शेवटच्या टप्प्यात लागवड केलेल्या कलिंगडाच्या वेलांमधून अपेक्षित फळधारणा झालेली नाही. ३ किलोचे कलिंगड एक ते दीड किलोचेच राहिले. त्यामुळे २० रुपये प्रतिकिलो मिळणारा दर कमी झाला आहे. याबाबत संगमेश्‍वर तालुक्यातील धामणी येथील प्रकाश रांजणे म्हणाले, उन्हाचा परिणाम यंदा कलिंगड शेतीवर झाला आहे. मे महिन्यामध्ये उत्पादन हाती येईल, अशा दृष्टीने सोडतीन हजार रोपांची लागवड केली होती. त्यामधून अपेक्षित उत्पादन आलेले नाही. वेलांची वाढच झालेली नाही तर फळाचा दर्जाच राहिलेला नाही.

----
चौकट १

कातळ भागातील तापमान अधिक आहे. जास्तीत जास्त ३४ अंश सेल्सिअसपर्यंतचे तापमान हापूस सहन करू शकतो. त्यापुढे तापमान गेले तर त्याचा परिणाम फळावर होतो आणि उत्पादन घटते तसेच दर्जाही घसरतो आणि दर कमी होतात.

- उमेश रहाटे, आंबा बागायतदार

.........
चौकट २

झाडांना वेळेत पाणी दिले गेले असेल तर फळामध्ये साका होणार नाही. त्यामुळे बागायतदारांनी वेळेत पाण्याचे नियोजन करणे आवश्यक होते.

- डॉ. महेश कुलकर्णी, कोकण कृषी विद्यापीठ
----------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com