कोट्यापेक्षा कमी गॅस येत असल्याने तुटवडा

कोट्यापेक्षा कमी गॅस येत असल्याने तुटवडा

१० (टुडे पान १ साठी)

- rat१०p३.jpg -
२४M८२७०८
महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना रिक्षा संघटनेचे पदाधिकारी

कोट्यापेक्षा कमी गॅस येत असल्याने तुटवडा

रिक्षा संघटना धडकली कार्यालयावर

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : सीएनजी गॅसचा कोटा कंपनीकडून कमी येत नसल्यामुळे जिल्ह्यात सीएनजी गॅसचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रिक्षा व्यावसायिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे संतापलेल्या रिक्षा व्यावसायिकांनी गुरूवारी (ता. ९) जे. के. फाईल्स येथील महानगर गॅसच्या कार्यालयावर धडक दिली. त्या वेळी गॅसच्या तुटवड्याचे कारण स्पष्ट झाले. याबाबत आमदार राजन साळवी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे शिवसेना प्रणित रिक्षासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
मे महिन्यातील उन्हाळी सुट्टी हा रिक्षा व्यावसायिकांसाठी प्रवासीभाडे मिळण्याचा हंगाम आहे; परंतु ज्या रिक्षा सीएनजीवर चालतात त्या रिक्षाचालकांना व्यवसाय करताना अडचणी येत आहेत. सीएनजी पंपांवर गॅस उपलब्ध नसतो. गॅस उपलब्ध झाल्यानंतर तो रिक्षामध्ये भरण्यासाठी दोन ते तीन तास रांगेत राहावे लागते. त्यामुळे वेळेत रिक्षा व्यवसाय करताच येत नाही. प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडील नोंदीनुसार २०२२-२३ मध्ये जिल्ह्यात सर्व प्रकारची ४ लाख ४१ हजार ७२ वाहने आहेत. त्यामध्ये ३ लाख १२ हजार ९७० दुचाकी वाहनांचा समावेश आहे. चाकरमानी किंवा पर्यटक रत्नागिरीत येतात तेव्हा रिक्षा व्यवसायाला गती मिळते. सध्या मे महिना असतानाही सीएनजी मिळत नसल्यामुळे रिक्षाचालकांचे आर्थिक नुकसान होत आहे.
जिल्ह्यात सीएनजी चालणारी एकूण ८ हजार ७१७ वाहने असून, त्यात रत्नागिरीतील २ ते ३ हजार रिक्षांचा समावेश आहे. रत्नागिरीत १५ ते २० दिवसांपासून सीएनजीची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे हैराण झालेले रिक्षा व्यावसायिक एकवटले आहेत. शिवसेनाप्रणित रिक्षासेनेच्या पदाधिकाऱी काल महानगर गॅसच्या जे. के. फाईल्स कार्यालयावर धडकले. कंपनीचे समन्वयक अमोल शिंदे यांच्यासोबत त्यांनी सीएनजी तुटवड्याबाबत चर्चा केली. तेव्हा त्यांनी सांगितले, ठरलेल्या कोट्यापेक्षा कमी प्रमाणात गॅसचा पुरवठा होत आहे. त्यामुळे तुटवडा जाणवत आहे. याबाबत गेल कंपनीशी आम्ही पत्रव्यवहार सुरू ठेवला आहे असे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com