शेवटच्या टप्प्यातील आंब्याचे भवितव्य पावसाच्या हाती

शेवटच्या टप्प्यातील आंब्याचे भवितव्य पावसाच्या हाती

४ (टूडे १ साठी)


-rat१०p८.jpg-
२४M८२७१९
पावस ः पूर्णगड परिसरामध्ये तिसऱ्या टप्प्यातील हापूस आंब्याची पीक अंतिम टप्प्यामध्ये
----------
अखेरच्या टप्प्यातील आंब्याचे
भवितव्य पावसाच्या हाती

कमी उत्पादनामुळे दर स्थिर ; थेट विक्रीमुळे फायदा
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १० ः पावस परिसरात आंबा हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. वाढलेल्या उष्णतेमुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा आठ ते दहा दिवसांमध्ये हापूस आंबा मार्केटमध्ये जाण्याची शक्यता आहे. या शेवटच्या टप्प्यात पावसाने मेहेरबानी केल्यास सर्व आंबा हाती येऊन चांगले उत्पन्न मिळू शकेल.
यावर्षी दोन टप्प्यांमध्ये हापूस कलमांना मोहोर आल्यानंतर पीकही समाधानकारक आले. ज्यांच्या बागेमध्ये आंबा आहे त्यांना चांगला दर मिळत असल्याने बागायतदारांमध्ये समाधान आहे. शेवटच्या टप्प्यातील आंबा २० ते २५ मे च्या दरम्यान बाजारपेठेमध्ये येणार आहे. वाढत्या उष्णतेमुळे आंबा लवकर तयार होण्याची शक्यता आहे. या आंब्याला किती दर मिळेल यावर बागायतदारांचे गणित अवलंबून राहणार आहे.
या संदर्भात पूर्णगड येथील आंबा बागायतदार राजू पाथरे म्हणाले, दोन टप्प्यातील हापूस आंब्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळाले. परंतु तिसऱ्या टप्प्यातील पिकाचे भवितव्य पावसावर अवलंबून आहे. कोकणातील हापूस आंब्याचे पीक दलालांच्या हाती असते. ते बागातदारांना पाहिजे तसा भाव देत नाहीत. त्यामुळे बागायतदार आता थेट विक्रीला प्राधान्य देत असल्याने त्यांना चांगला दर मिळतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com