अरविंद केजरीवालांना जामीन 
म्हणजे लोकशाहीचा विजय
अरविंद केजरीवालांना जामीन 
म्हणजे लोकशाहीचा विजय

अरविंद केजरीवालांना जामीन म्हणजे लोकशाहीचा विजय अरविंद केजरीवालांना जामीन म्हणजे लोकशाहीचा विजय

82802
विवेक ताम्हाणकर

अरविंद केजरीवालांना जामीन
म्हणजे लोकशाहीचा विजय

ताम्‍हाणकर : सर्वोच्च न्यायालयाचे आभार


कणकवली, ता.१० : ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. केजरीवाल यांना मिळालेला जामीन म्हणजे लोकशाहीचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया ‘आप’चे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी आज दिली. तसेच त्यांनी पक्षाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे मनःपूर्वक आभार मानले.
श्री.ताम्‍हाणकर यांनी म्‍हटले की, ‘‘अरविंद केजरीवाल यांना १ जूनपर्यंत जामीन मंजूर झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष आणि इंडिया आघाडीला मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी केजरीवाल यांना ईडीने २१ मार्चला अटक केली होती. मागील ५० दिवसांपासून ते तुरुंगात आहेत. सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केजरीवाल यांना हा अंतरिम जामीन सुप्रिम कोर्टाने मंजूर केला आहे. न्यायालयाचा निर्णय हा एक संकेत आहे की देशातील लोकशाही धोक्यात आहे. लोकसभा निवडणुकीत आपला सपशेल पराभव दिसताच ईडी सारख्या यंत्रणांचा वापर करून भाजपच्या मोदी सरकारने अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये डांबण्याचा प्रयत्न केला. एका खोट्या प्रकरणांत गंभीर गुन्हे लावून देखील अवघ्या ५० दिवसांत केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळणे ही बाब सत्याची बाजू दर्शवते. आता निवडणुकीच्या रणांगणात केजरीवाल यांच्या परिवर्तनवादी विचाराची तोफ निश्चितपणे धडाडेल.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com