संस्कार शिबिराचे
मालवणात आयोजन

संस्कार शिबिराचे मालवणात आयोजन

संस्कार शिबिराचे
मालवणात आयोजन
मालवण : येथील बॅ. नाथ पै सेवांगणच्या वतीने १७ ते २१ मे या कालावधीत सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० यावेळेत साने गुरुजी संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात शिरोळ येथील साथी बाबासाहेब नदाफ व सहकारी यांचे ऐरोबिक्स, योगा, कॅलेस्थिनिक्स, नृत्य, गाणी, गोष्टी, गटचर्चा, खेळ, पथनाट्य, लेझीम, झांज, दांडिया या विषयांवर मार्गदर्शन, धमाल मस्ती आणि खेळ होणार आहेत. या शिबिरात १० ते २० या वयोगटातील प्रथम येणाऱ्या ४० मुलांना प्रवेश दिला जाणार आहे. इच्छुकांनी सेवांगण येथे नावे नोंदवावीत, असे आवाहन ॲड. देवदत्त परुळेकर, किशोर शिरोडकर, लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी केले आहे.
...........
पावसाळी हंगामात
जलयानांना बंदी
सिंधुदुर्गनगरी ः अंतर्देशीय जहाज कायदा १९१७ अंतर्गत नोंदणी झालेल्या सर्व जलयानांना यावर्षी २६ मे ते ३१ ऑगस्ट या पावसाळी हंगामात बंदी करण्याबाबत निर्देशित करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक बंदर अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ, वेंगुर्ला बंदरे समूह, सिंधुदुर्ग कॅ. एस. व्ही. भुजबळ यांनी दिली. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून खराब हंगाम सुरू होणे अपेक्षित असते. त्यामुळे जीवन आणि पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी या कायद्यांतर्गत नोंदणी झालेल्या सर्व जलयानांना २६ मे ते ३१ ऑगस्ट या पावसाळी हंगामाच्या कालावधीत वापरास बंदी करण्यास आलेली आहे. सर्व नौका मालकांनी व जलक्रीडा, प्रवासी वाहतूक व्यावसायिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com