रायपाटण रस्त्यालगतची साईडपट्टी धोकादायक

रायपाटण रस्त्यालगतची साईडपट्टी धोकादायक

३८ (पान ४ साठी)


-rat१०p२७.jpg-
२४M८२८३२
राजापूर ः रायपाटण येथे ओणी-अणुस्कुरा मार्गावर साईडपट्टीचा खचलेला भाग.
-------------

रायपाटण रस्त्यालगतची
साईडपट्टी धोकादायक
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १० ः तालुक्यातील ओणी-अणुस्कुरा मार्गावर रायपाटणदरम्यान रस्त्यालगतच्या साईडपट्टीच्या बाजूचा भाग तुटला आहे. त्यामुळे वाहने चालविणे धोकादायक झाले आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून बांधकाम विभागाने तत्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी वाहनचालकांसह प्रवाशांकडून केली जात आहे.
ओणी-पाचल-अणुस्कुरा मार्गावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. या मार्गावर रायपाटण येथील श्री वडचीआई मंदिर ते टक्केवाडी या भागामध्ये असलेल्या मोरीच्या दरम्यान रस्त्याच्या बाजूला असलेल्या दोन ठिकाणच्या साईडपट्टीचा भाग खचला आहे. साईडपट्टीच्या खचलेल्या भागाचा फारसा अंदाज वाहनचालकांना येत नाही. साईडपट्टी खचलेल्या ठिकाणी दोन वाहने समोरासमोर आल्यास वाहन पुढे नेताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. त्यामुळे खचलेल्या साईडपट्टीच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ डागडुजी वा योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी वाहनचालकांसह प्रवाशांकडून केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com