ज्ञानदीप दापोलीची शालिनी दाभिळकर जेईई ॲडव्हान्ससाठी पात्र

ज्ञानदीप दापोलीची शालिनी दाभिळकर जेईई ॲडव्हान्ससाठी पात्र

४३ ( पान ३ )

शालिनी दाभिळकर
‘जेईई’ ॲडव्हान्ससाठी पात्र

दाभोळ, ता. १० : राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेशासाठी झालेल्या जेईई मेन्स परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला. या निकालात ज्ञानदीप दापोलीच्या शालिनी दाभिळकर हिने यश मिळवले. त्यामुळे ती जेईई ॲडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरली आहे.
शालिनी हिने पहिली ते दहावीपर्यंत ज्ञानदीप संस्थेच्या संतोषभाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. ज्ञानदीपमध्ये अकरावीच्या पहिल्या बॅचची सुरवात अवघ्या सात मुलांनी झाली. त्यातील पाच विद्यार्थी सीईटी, दोन जेईई या पूर्वपरीक्षेची तर दोन विद्यार्थी नीटची तयारी करत होते. पहिल्याच प्रयत्नात शालिनीने जेईई मेन्समध्ये यश प्राप्त केले. दापोलीत ब्रिल्यंट इन्स्टिट्यूट खेड व ज्ञानदीप विद्यामंदिर दापोली यांच्या माध्यमातून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना दापोलीत राहूनच आपल्या उज्ज्वल भविष्याची सुरवात करण्याची संधी मिळाली आहे. नजीकच्या काळात सीईटी, जेईई, नीट या स्पर्धा परीक्षांत संस्थेचे विद्यार्थी उज्ज्वल यश मिळवतील, हेच या निकालाचे भाकित आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com