बसवेश्‍वर महाराज जयंती 
कणकवली येथे उत्‍साहात

बसवेश्‍वर महाराज जयंती कणकवली येथे उत्‍साहात

82853
कणकवली : येथील भालचंद्र महाराज भक्‍तनिवास येथे श्री बसवेश्वर महाराज यांच्या बाल मूर्तीस पाळण्यात घालून पाळणा म्हणताना सुहासिनी (छायाचित्र : अनिकेत उचले)


बसवेश्‍वर महाराज जयंती
कणकवली येथे उत्‍साहात

कणकवली, ता. १० : शहरातील भालचंद्र महाराज संस्थानातील भक्त निवास येथे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर श्री बसवेश्वर महाराज यांची जयंती भक्तिमय वातावरणात, विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. या जन्मोत्सव सोहळ्यासाठी शहर व परिसरातील लिंगायत समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती.
सकाळच्या सत्रात श्रीगणेश पूजा, श्री बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ. कणसे दांपत्‍याच्या हस्ते करण्यात आले. तर दुपारी बारा वाजता महिलांकडून श्री बसवेश्वर यांच्या बालमूर्तीस पाळण्यात घालून पाळणा म्हणत जन्मसोहळा साजरा केला. त्‍यानंतर आरती, तीर्थप्रसाद कार्यक्रम झाले; तर सायंकाळच्या सत्रात महिलांसाठी विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यावेळी समाजाचे विश्वस्त, कणकवली तालुक्यातील लिंगायत समाजबांधव तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com