बेपत्ता झालेल्या तरुणाचा
झाजमतर किनारी मृतदेह

बेपत्ता झालेल्या तरुणाचा झाजमतर किनारी मृतदेह

बेपत्ता झालेल्या तरुणाचा
झाजमतर किनारी मृतदेह

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १० ः तालुक्यातील तळवडे-घाडीवाडी येथील एका तरुणाचा परिसरातील झाजमतर किनारी मृतदेह आढळला. जयदीप पांडुरंग घाडी (वय २३) असे त्याचे नाव आहे. ही घटना गुरुवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. पोहण्यासाठी गेला असताना त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची येथील पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयदीप हा तळवडे परिसरात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास पोहण्यासाठी गेला होता; मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बेपत्ता झाला होता. स्थानिकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. अखेर रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास झाजमतर किनारी त्याचा मृतदेह सापडला. घटनेची माहिती जयदीप याचे वडील पांडुरंग जनार्दन घाडी (वय ६०) यांनी येथील पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास पोलिस हवालदार महेंद्र महाडिक करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com