तिलारी योजनेची पाईपलाईन 
शिरोडा रेडी पुलाजवळ फुटली 
तिलारी योजनेची पाईपलाईन 
शिरोडा रेडी पुलाजवळ फुटली

तिलारी योजनेची पाईपलाईन शिरोडा रेडी पुलाजवळ फुटली तिलारी योजनेची पाईपलाईन शिरोडा रेडी पुलाजवळ फुटली

82889
वेंगुर्ले ः शिरोडा पुलाजवळ तिलारी योजनेची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले.


तिलारी योजनेची पाईपलाईन
शिरोडा रेडी पुलाजवळ फुटली

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले,ता.१० ः शिरोडा रेडी जोडणाऱ्या पुलाजवळ आज दुपारी तिलारी पाणी योजनेची पाईप लाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले.
या प्रकाराबाबत संबंधित विभागाला शिरोडा ग्रामस्थांकडून कळविण्यात आले आहे.
सध्या मे महिना असल्याने पाण्याची मोठी गरज भासत आहे. शिरोडा गावात पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनचे काम सुरू असल्याने शिरोड्यामधील अनेक ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान तिलारी पाणी योजना अद्याप सुरू झाली नसली तरी पाण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या पाईपलाईनद्वारे टेस्टिंग चालू आहे. मात्र आज दुपारी शिरोडा रेडी मार्गावरील पाईपलाईन खराब झाल्याने तेथून हजारो लिटर पाणी वाया जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com