तळेघर तमाशा मंडळाचा सलग सातवा बाजार

तळेघर तमाशा मंडळाचा सलग सातवा बाजार

.४ ( पान ६ )

rat११p५.jpg ः
P२४M८२९२६
महाड ः प्रेक्षकांच्या लक्षणीय उपस्थितीत लोककला सादर करताना तळेघर तमाशा मंडळ.
rat११p६.jpg -
२४M८२९२७
माणगाव ः जननीदेवी तमाशा मंडळ तळेघर करावडेवाडी कला सादर करताना.

तळेघर मंडळाने चैत्राच्या यात्रा गाजविल्या

एका वर्षात सलग सातवा बाजार ; तुरेवाल्यांना टक्कर
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता.११ ः तालुक्यातील तळेघर करावडेवाडी येथील जननीदेवी तमाशा मंडळाने यावर्षी रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात सलग सात विक्रमी कार्यक्रम करताना रसिकांचे मनोरंजन करून हनुमान जयंतीच्या चैत्राच्या यात्रा जोरदार गाजविल्या. पारंपरिक लोककलेचा मथुरेचा बाजार सादर करताना आपल्या अनुभव संपन्नतेने ही लोककला निकोप पद्धतीने जोपासली.
मंडणगड, महाड, माणगाव, पोलादपूर, कोलाड व दापोली या तालुक्यातून ग्रामदेवता व हनुमान जयंतीनिमित्त वार्षिक यात्रोत्सवात मनोरंजनासाठी शक्तीतुरा लोककला तमाशा याचे आयोजन केले जाते. सदालाल घराण्यातील जननीदेवी तमाशा मंडळ तळेघर करावडेवाडी शक्तीवाले हे गेली चार दशके ही परंपरा जोपासत आहेत. त्यांना यावर्षी सलग सात कार्यक्रमांच्या सुपारी मिळाल्या होत्या. यामध्ये भवानी नडगाव, भिंताड, मूर, देवळी, सव, वडपाले, पुरार या यात्रांचा समावेश होता. या तमाशा मंडळाचे प्रमुख शाहीर मनोहर पारदुले व शाहीर सुरेश पेडणेकर यांनी आपल्या शिष्यमंडळींना घेऊन जबरदस्त कार्यक्रम सादर केले. सव या मानाई देवीच्या यात्रेत तुरेवाले तुळशी तमाशा मंडळासोबतचा सामना अटीतटीचा आणि प्रेक्षणीय झाला. पारंपरिक बाज जपताना ग्रंथ, शास्त्र, पुराणातील कथांचा आधार घेत मायेचे म्हणजे शक्तीचे श्रेष्ठत्व अधोरेखित करत कलगीचा डंका वाजवला. नृत्य कलाकार म्हणून राज जाबरे, श्लोक करावडे, श्रेयस घाणेकर यांनी तर मावशी सुरेशबुवा पेडणेकर, कृष्ण मनोहर बुवा पारदुले, पेंद्या सुदाम अनंत गोठल यांनी भूमिका साकारली.
----
आध्यात्मिक संवाद रंगले
सवाल जवाब करताना शाहिरांचे आध्यात्मिक संवाद रंगले. तम नावाचे अंधाररूपी दुःख बाजूला सारून मन प्रफुल्लित व आनंदी करण्याची आशा म्हणजे तमाशा ही लोककला कालपरत्वे दुर्मिळ होत चालली असताना या तमाशा मंडळाने निकोप आणि कला हितकारक पद्धतीने ती जपण्याचा प्रयत्न केल्याने त्यांचे रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील कलाक्षेत्रातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com