बसस्थानकाजवळ रस्त्यावर मच्छीविक्री

बसस्थानकाजवळ रस्त्यावर मच्छीविक्री

११ ( पान ५ साठी, अँकर )
-----------

- rat११p९.jpg -
२४M८२९३२
पावस -बसस्थानकासमोरील रस्त्यावर मच्छीविक्रेत्या महिला राजरोसपणे मच्छी व्यवसाय करत आहेत.

पावस बसस्थानकाजवळील रस्त्यावर मच्छीविक्री

ग्रामपंचायतीला देतात भाडे; मच्छीमार्केट ओस

सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ११ ः पावस बसस्थानकाजवळील रस्त्यावर मच्छीविक्रेत्या राजरोसपणे दररोज मच्छीविक्रीला बसत असल्यामुळे आजूबाजूच्या दुकानदार व हॉटेल व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे होणाऱ्या दुर्गंधीपासून मुक्त होण्यासाठी तातडीने पावस ग्रामपंचायतीने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सुरवातीला पावस बसस्थानकामधील शौचालयाची दुरवस्था होती; मात्र नव्याने स्वच्छ भारत कार्यक्रमांतर्गत बांधकाम केल्यानंतर काही दिवस शौचालयाची अवस्था चांगली होती; परंतु आता त्याची टाकी भरू लागल्याने त्याचा त्रास आजूबाजूच्या लोकांना सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर रस्त्यालगत गेले अनेक दिवस मच्छीविक्रेत्या ग्रामपंचायतीच्या परवानगीने राजरोस मच्छीमार्केट उपलब्ध असताना देखील या ठिकाणी आपला व्यवसाय करत आहेत. या व्यवसायामुळे येथील दुकानदारांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत पूर्वी ग्रामपंचायतीने या मच्छीविक्रेत्या महिलांवर कारवाई केली होती. कालांतराने ही कारवाई थांबवण्यात आली. काही दिवसानंतर पुन्हा मच्छीविक्रेत्या महिला आपला व्यवसाय करू लागल्या. याबाबत वारंवार तक्रार करूनही मच्छीविक्रेत्या व्यवसाय राजरोसपणे करत आहेत. या संदर्भात विक्रेत्या म्हणतात, या व्यवसायासंदर्भात आम्ही ग्रामपंचायतीकडे भुईभाडे भरतो. त्यामुळे आम्ही बिनधास्तपणे आमचा व्यवसाय करतो; परंतु आजूबाजूच्या दुकानदार व हॉटेल व्यावसायिकांना या दुर्गंधीचा त्रास दररोज सहन करावा लागतो. हा व्यवसाय तातडीने या ठिकाणाहून हलवून त्यांना ग्रामपंचायतीने पावस बाजारपेठेतील त्यांच्या हक्काच्या जागेत बसवावे, अशी मागणी दुकानदारांकडून होत आहे.
------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com