बाग राखणाऱ्या गुरख्यांच्या माहितीसाठी धावपळ

बाग राखणाऱ्या गुरख्यांच्या माहितीसाठी धावपळ

गुरख्यांच्या माहितीसाठी बागायतदारांची धावपळ
भावांच्या खुनानंतर फतवा; पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याचा आदेश
पावस, ता. १२ः गोळप येथे दोन सख्ख्या नेपाळी भावांचा दारूच्या नशेमध्ये झालेल्या भांडणात खून झाला. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक भागात बागायतदाराने सतर्क राहावे, या दृष्टीने पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्यावतीने हद्दीतील सर्व बागायतदारांना आपल्याकडे राखणदारीस असलेल्या सर्व नेपाळी गुरख्यांची माहिती पोलिस ठाण्यात देण्याचा आदेश केल्याने सर्व बागायतदारांची धावपळ उडाली आहे.
दरवर्षी पावस परिसरामध्ये आंबा बागायती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे स्थानिक मजूर उपलब्ध होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात नेपाळी गुरखे आंबाबागेची राखण करण्यासाठी व इतर कामांकरिता त्याचबरोबर मच्छीमार बोटीवर काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात येतात. या संदर्भात पोलिस ठाण्याच्यावतीने या सर्व लोकांना संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रत्येक भागात आंबा बागायतदाराने आपल्याकडे असलेल्या गुरख्यांची सर्व माहिती दरवर्षी जमा करावी, असे सांगण्यात येऊनही कोणतीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे या परिसरामध्ये गुरखे राजरोस आंबा बागायतदारांकडे कामे करत असतात; पण नोंदी नसतात. दारूच्या नशेमध्ये अनेक भानगडी निर्माण होतात त्याचबरोबर आंबाचोरीचे प्रकारही मोठ्या प्रकार घडतात, गुन्हे घडतात. यातून उद्भवणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी ही माहिती गोळा करण्याचे आदेश देण्यात आले होते; परंतु त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अनेक गुन्हे तपासात अडथळे निर्माण होतात.
-----
चौकट
कारवाईचा इशारा
पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्यावतीने प्रत्येक बागायतदारांना त्यांच्याकडे असलेल्या गुरख्यांची माहिती तातडीने देण्यात यावी अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा आदेश देण्यात आल्याने अनेक आंबा बागायतदार आपल्याकडील गुरख्यांची माहिती देण्यास धावपळ करत आहेत. आंबा हंगाम संपत आल्याने अनेक गुरखे परतीच्या मार्गावर आहेत, असे असताना अंतिम टप्प्यांमध्ये माहिती देण्याची वेळ त्यांच्यावर येऊन ठेपली आहे.
------
कोट
आंबा राखणी व इतर कामांसाठी येथील लोकांना गुरखे आर्थिकदृष्ट्या परवडत असतात; परंतु त्यांचा कोणताही पत्ता नसल्यामुळे ते आपल्या शांतमय परिसरामध्ये गडबड करतात. त्याचा त्रास भोगावा लागतो. याला आळा घालण्यासाठी व तपासात अडचण येऊ नये याकरिता नोंदी आवश्यक आहेत.
- सुधीर धायरीकर, पोलिस निरीक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com