चिपळूण काँग्रेसची अवस्था निर्नायकी

चिपळूण काँग्रेसची अवस्था निर्नायकी

१७ ( पान ५ मेन )

चिपळूण कॉग्रेसची अवस्था निर्णायकी

कार्यकर्त्यांचीच बॅटिंग; तालुकाध्यक्षावर जिल्हाध्यक्षाचे मौन

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ११ ः लोकसभेची निडणूक संपली तरी चिपळूण तालुका काँग्रेसला तालुकाध्यक्ष सापडलेला नाही. माजी तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर हे पद गेले अनेक महिने रिक्त आहे. अनेकजण या पदासाठी इच्छुक असतानाही काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी ही निवड जाहीर केलेली नाही.
काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी काही काळ तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली; मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांना शरद पवार राष्ट्रवादी पक्षाची ऑफर आली आणि त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. काँग्रेस तालुकाध्यक्ष म्हणून काम करताना यादव यांनी चिपळूण बसस्थानकाजवळ काँग्रेसचे स्वतंत्र संपर्क कार्यालय सुरू केले. पक्षसंघटना वाढीसाठी त्यांनी प्रयत्न केला; मात्र त्यांनी काँग्रेस सोडल्यानंतर येथील तालुकाध्यक्षपद रिक्त झाले. या पदावर खेर्डीतील सुधीर दाभोळकर यांची नियुक्ती जाहीर केली होती; मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला. परिणामी, या निवडीला स्थगिती मिळाली.
चिपळूण काँग्रेस तालुकाध्यक्षपदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. लोकसभा निवडणूक सुरू असतानाही काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी याबाबतची दखल घेऊन निर्णय घेतलेला नाही. तालुकाध्यक्षपदासाठी माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाह, इब्राहीम दलवाई, कैसर देसाई, भरत लब्धे, महादेव चव्हाण, सुधीर दाभोळकर असे अनेकजण इच्छुक आहेत. याबाबत चर्चा करण्यासाठी पक्षाने निरीक्षकदेखील चिपळुणात पाठवले होते. त्या निरीक्षकांनी इच्छुकांशी चर्चादेखील केली. काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाडे हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी चिपळुणातदेखील हजर होते; मात्र तालुकाध्यक्ष निवडीबाबत त्यांनी कोणतेच भाष्य़ केलेले नाही. त्यामुळे लोकसभेची निवडणूक काँग्रेस तालुकाध्यक्षाविनाच पार पडली.
...........
चौकट
अध्यक्ष का मिळत नाही?
लोकसभेनंतर आता पदवीधर मतदार संघाची विधान परिषदेची निवडणूक होत आहे. त्यानंतर नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. आगामी वर्ष निवडणुकांचे असतानादेखील चिपळूण तालुका काँग्रेसला अध्यक्ष का मिळत नाही, असा सवाल कार्यकर्ते विचारत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com