क्राईम

क्राईम

१८ ( पान ३ )

दोन मोटारीच्या धडकेत ४ जखमी

चिपळूण ः संगमेश्वर तालुक्यातील निवे बुद्रुक येथील आश्रम स्कूल स्टॉपच्या वळणावर शुक्रवारी दुपारी ३ वा. दोन मोटारीची धडक बसून भीषण अपघात झाला. यामध्ये चालकासह चौघेजण जखमी झाले आहेत. या अपघातप्रकरणी कारचालक संजय लक्ष्मण जुवळे (४७, रा. सांगली, गव्हर्नमेंट कॉलनी, हसने आश्रम मिरज, सांगली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात संजय जुवळे याला गंभीर दुखापत झाली आहे शिवाय त्याच्या गाडीतील प्रवासी श्रद्धा शिवाजी तुपे (२० वर्षे), सार्थक शिवाजी तुपे (१२ वर्षे, दोन्ही रा. इस्लामपूर) व संजीवनी संजय जुवळे (४२ वर्षे, रा. सांगली) जखमी झाले आहेत. फिर्यादी हे मोटीरीतून रत्नागिरीहून चिपळूणच्या दिशेने घेऊन जात होते. याचवेळी संजय लक्ष्मण जुवळे याच्या मोटारीने मागील बाजूने जोराची धडक दिली. यामध्ये दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे. या अपघातप्रकरणी संजय जुवळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
---------------
गळफास घेऊन तरुणीची आत्महत्या

चिपळूण : शहरातील तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. याबाबत येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. घरी कोणीही नसताना किचन रूममधील पंख्याच्या हुकाला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार घरच्यांच्या लक्षात येताच त्यांना धक्का बसला. तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला; मात्र अद्याप तिच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी चिपळूण पोलिस अधिक तपास करीत आहेत.
----------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com