अरविंद पाटील नवनिर्माण हायचे नवे मुख्याध्यापक

अरविंद पाटील नवनिर्माण हायचे नवे मुख्याध्यापक

.२० ( )
-----------
rat११p१२.jpg -
२४M८२९५१
अरविंद पाटील

अरविंद पाटील ‘नवनिर्माण’ मुख्याध्यापक

रत्नागिरी, ता. ११ : नवनिर्माण शिक्षणसंस्था संचलित नवनिर्माण हायस्कूल इंग्लिश मीडियम शाळेचे मुख्याध्यापक म्हणून अरविंद पाटील (कोल्हापूर) यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे.
पाटील यांनी पन्हाळा (जि. कोल्हापूर) येथील संजीवन विद्यानिकेतन येथे २००१ मध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून सुरवात केली. त्यानंतर शाहूनगर येथील राजर्षि छत्रपती शाहू पब्लिक स्कूल येथे २०१२ ते २०१५ या कालावधीत मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले. पुढे वर्षभर त्यांनी आजरा येथील दी डायनामिक पब्लिक स्कूल येथे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावली आहे. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदवी घेतली असून, यात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे तसेच त्यांनी सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन्स आणि कॉम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये अॅडव्हान्स डिप्लोमा केला आहे. नवनिर्माण शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये आणि संचालिका सीमा हेगशेट्ये यांनी संस्थेत त्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पाटील यांनी संस्थेची आपल्यावर दिलेली जबाबदारी सर्वांच्या सहकार्याने प्रामाणिकपणे पूर्ण करणार असल्याचे सांगितले.
---

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com