कोतवडेला ५२ हजार रुपयांची देणगी

कोतवडेला ५२ हजार रुपयांची देणगी

२४ पान ५ साठी

rat११p१३.jpg-
२४M८२९५२
रत्नागिरी : श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन कोतवडे इंग्लिश स्कूलला दहावी बॅचच्यावतीने आर्थिक मदत देताना विद्यार्थी.

कोतवडे स्कूलला ५२ हजारांची देणगी

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबई संचलित श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन कोतवडे इंग्लिश स्कूलला दहावी बॅच २००१- २००२ च्यावतीने ५२ हजार रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.
ज्या शाळेमध्ये सहा वर्षे शिक्षण घेतले, ज्या शाळेने जीवन जगण्यास सक्षम केले अशा शाळेच्या प्रती कृतज्ञता निधी म्हणून दहावीच्या २००१-२००२च्या माजी विद्यार्थ्यांनी ५२ हजार रुपयांचे भरीव आर्थिक योगदान शाळेचे नूतनीकरण करण्यासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. या वेळी कोतवडे ग्रामस्थ मंडळाचे (मुंबई) उपाध्यक्ष संजय मयेकर, सहसचिव नरेश कांबळे, सखाराम कांबळे, राजेंद्र फणसोपकर, संजय कोलगे, मनोज कोलगे, मुख्याध्यापक प्रेमदास पवार, माजी विद्यार्थी प्रतिनिधी प्रवीण चव्हाण, प्रमोद लोगडे, रोहित पेडणेकर, युवराज मांडवकर, विश्वजित धोपट, लिपिक संदीप कोलगे, प्रमोद पांचाळ व खांडके उपस्थित होते. या आर्थिक योगदानाबद्दल कोतवडे ग्रामस्थ मंडळ, शाळा समिती शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने देणगीदार विद्यार्थ्यांचे आभार मानण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com