हर्षदाची फायरिंग कॉम्पिटिशनसाठी निवड

हर्षदाची फायरिंग कॉम्पिटिशनसाठी निवड

swt117.jpg
82976
हर्षदा पवार

हर्षदाची फायरिंग कॉम्पिटिशनसाठी निवड
राष्ट्रीय स्पर्धाः सिंधुदुर्ग महाविद्यालयाची विद्यार्थिनी
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ११ : येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एन.सी.सी. विभागाची विद्यार्थिनी हर्षदा पवार हिचे राष्ट्रीय पातळीवरील फायरिंग कॉम्पिटिशनमध्ये चौथ्या राऊंडसाठी महाराष्ट्र राज्यातून पहिल्या चोविस जणांत निवड झाली आहे.
इंडियन आर्मीमार्फत घेण्यात येत असलेल्या राष्ट्रीय पातळीवरील फायरिंग कॉम्पिटिशनमध्ये महाराष्ट्रातून २४ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यामध्ये हर्षदा पवार हिची निवड झाली आहे. आतापर्यंत बटालियन आणि ग्रुपमधून तीन फेऱ्या यशस्वी पूर्ण करून चौथ्या फेरीत तिची निवड झाली आहे. यासाठी ५८ महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्गचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाल, सुभेदार मेजर दिनेश गेडाम व इतर सर्व आर्मी ऑफिसरांचे सहकार्य लाभले. हर्षदा ही ५८ महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्गमार्फत स्पर्धेत उतरली आहे. तिला स. का. पाटील महाविद्यालयाचे एन.सी.सी. विभागप्रमुख लेफ्टनंट प्रा. एम. आर. खोत यांचे मार्गदर्शन लाभले. ती सध्या वाणिज्य शाखेच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. महाविद्यालयाकडून एन.सी.सी.मध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या फायरिंग कॉम्पिटिशन व इतर एडवेंचर कॅम्पमध्ये सातत्याने सहभागी होत महाविद्यालयाला यश मिळवून दिले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य शिवराम ठाकूर, सर्व स्टाफ, कृ. सी. देसाई शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, सचिव गणेश कुशे आणि इतर संस्था पदाधिकारी यांनी हर्षदा अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना एन.सी.सी.मध्ये प्रवेश घेतल्यास संरक्षण दल, पोलिस दलामध्ये करिअर करता येते व इतरही क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत असतात. देशाचा चांगला नागरिक बनण्यासाठी एन.सी.सी.मध्ये सहभाग घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी एन.सी.सी.मध्ये प्रवेश घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नावलौकिक करावा, असे एन.सी.सी. विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रा. खोत यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com