मांडवी धूपप्रतिबंधक बंधारा ढगरला

मांडवी धूपप्रतिबंधक बंधारा ढगरला

पान १

८२९६१

मांडवी धूपप्रतिबंधक बंधारा ढगरला
उधाणाच्या लाटांचा मारा ः वर्षभरात दुरवस्थेमुळे कामाच्या दर्जाकडे बोट
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : शहरातील मांडवी किनाऱ्यावरील धूपप्रतिबंधक बंधारा उधाणाच्या लाटांमुळे ढगरला. वर्षभरापूर्वी हा बंधारा घालण्यात आला, अजून तो पूर्ण झाला नाही तोवर ढगरल्याने बंधाऱ्याच्या कामाकडे बोट दाखवले जात आहे.
शहरातील मांडवी समुद्रकिनारा सुरक्षित असला तरी चक्रीवादळामुळे त्याला धोका निर्माण झाला होता. फयान, निसर्ग, आदी चक्रीवादळात उधाणाच्या लाटा रस्त्यापर्यंत आल्या होत्या. काही भागांत पाणी माडांच्या बागेत शिरून माड कोलमडले होते. काही ठिकाणी घरात पाणी शिरले होते. त्यामुळे या किनारी भागाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने स्थानिकांनी संरक्षण बंधाऱ्याची मागणी केली होती. अनेक वर्षांपासून या मागणीकडे दुर्लक्ष होत होते. मांडवीकरांनी हा विषय लावून धरल्यानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकारातून आणि सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून मंजूर झाले आहे. मांडवी जेटीपासून पेठकिल्ल्याच्या पायथ्यापर्यंत सुमारे साडेतीनशे मीटरचा धूपप्रतिबंधक बंधारा मंजूर झाला.
दोन टप्प्यात हे काम केले. पहिल्या टप्प्यात १ कोटी, तर दुसऱ्या टप्प्यात २ कोटी असे ३ कोटींचे हे काम आहे; परंतु हे काम अजून अर्धवट आहे. गेल्या वर्षी पहिल्या टप्पा झाला. आता दुसऱ्या टप्प्याचे काम थांबले आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पहिल्या टप्प्यातील बंधाऱ्याचे दगड उधाणाच्या लाटांमुळे ढगरले आहेत. दिवसेंदिवस हे दगड समुद्र गिळंकृत करत असल्याचे दिसत आहे. यावरून बंधाऱ्याच्या कामाकडे बोट दाखविले जात आहे. याबाबत पत्तन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी दुजोरा दिला.


सीआरझेडमुळे काम थांबले
मांडवी जेटीपासून खडपेवठार ते राजीवड्यापर्यंतचाही ७ कोटींचा धूपप्रतिबंधक बंधारा मंजूर झाला आहे; परंतु त्याचे कामही सीआरझेडमुळे थांबले आहे. लवकरच पुढील परवानगी घेऊन हे कामदेखील सुरू केले जाणार आहे. त्यामुळे मांडवीचा हा किनारा संरक्षित होणार आहे, अशी माहिती माजी नगरसेवक मुन्ना चवंडे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com