कृष्णा अँटिऑक्सिडंट्स स्थापनादिनी रक्तदान शिबिर

कृष्णा अँटिऑक्सिडंट्स स्थापनादिनी रक्तदान शिबिर

१२ ( पान ५ )

‘कृष्णा अँटिऑक्सिडंट्स’
स्थापनादिनी रक्तदान शिबिर

चिपळूण, ता. ११ ः खडपोली येथील कृष्णा अँटिऑक्सिडंट्स कंपनीचा स्थापना दिवस बुधवारी ८ मे रोजी रक्तदान शिबिराने साजरा करण्यात आला. या शिबिरात ७५ रक्तदाते यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपसली. विविध सामाजिक उपक्रम कंपनीत राबवले जातात. आजूबाजूच्या भागातील शैक्षणिक, धार्मिक, क्रीडा या बाबतीत विविध ठिकाणी सढळ हस्ते काम करत असते.
शिबिराचे उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, कंपनीचे अधिकारी रहमान, धीरज गुप्ता, अशोक पाटील, रमेश वाणी, मूर्ती, एच. आर. सुयोग चव्हाण, संतनू मलिक, प्रमोद यादव, अभिक गुप्ता, चंचल महंती, संजय मनवळ, सिद्धेश मुळे, संजय जाधव, रवींद्र रोकडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. शिबिरादरम्यान वनविभागीय अधिकारी कीर यांनी भेट देऊन व स्वतः रक्तदान केले. या वेळी रहमान यांनी पाच माणसातून सुरू केलेली कंपनी आज साडेचारशे माणसापर्यंत गेली. तीच कंपनी आज सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमामध्ये अग्रेसर असते, याचा आनंद मिळतो असे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com