आज सायकल फेरी

आज सायकल फेरी

पान ३ किंवा ५

सायकलिंग क्लबतर्फे
दापोलीत आज सायकलफेरी
सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. ११ : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसनिमित्ताने दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवारी, १२ मे रोजी सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या फेरीदरम्यान वळणे एमआयडीसी येथील काही कंपन्यांना भेट देऊन तिथे वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती करून घेण्यात येणार आहे.
देशभर राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस ११ मे रोजी साजरा केला जातो. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे योगदान आणि या क्षेत्रात भारताने केलेल्या अतुलनीय कामगिरीची साक्ष देणारा हा दिवस आहे. त्या निमित्ताने ही फेरी आहे. ही फेरी आझाद मैदान दापोली येथून सकाळी ७ वाजता सुरू होईल ती उदयनगर-वडाचा कोंड-जालगाव बाजारपेठमार्गे वळणे एमआयडीसी येथे जाईल. तिथे असणाऱ्या अरुणश्री फार्मफूड, त्रिमूर्ती प्लास्टिक, बालाजी पावडर कोटिंग, अजरालय अॅग्रो इंडस्ट्रीज, ओरा ग्लास फायबर, सुरूची फूड्स आणि आईस्क्रिम, कोकण फळप्रक्रिया काजू फॅक्टरी इत्यादी कंपन्यांना भेट देऊन तिथे घेतले जाणारे उत्पादन, बनणारे पदार्थ आणि त्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान याबद्दल माहिती करून घेतली जाईल. सायकल फेरीचा समारोप आझाद मैदानात सकाळी ९.३० वा. होईल. या फेरीसाठी कोणतेही प्रवेशशुल्क नाही. सर्व वयोगटातील सायकलप्रेमी सहभागी होऊ शकतात. सर्वांनी यामध्ये सहकुटुंब, सहपरिवार सहभागी व्हा आणि आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com