फळबाग लागवडीवर 11 कोटी 84 लाख खर्ची

फळबाग लागवडीवर 11 कोटी 84 लाख खर्ची

फळबाग लागवडीवर ११ कोटी ८४ लाख खर्ची
मनरेगा योजना; सहा वर्षांमध्ये शेतीपूरक रोजगार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ ः कृषी अधिकारी कार्यालयामार्फत गेल्या सहा वर्षांमध्ये राबवण्यात आलेल्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीसाठी ११ कोटी ८४ लाखांहून अधिक निधी खर्ची पडला आहे.
या योजनेत तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शेतीपूरक रोजगार मिळवला. शासनाकडून थेट बँकखात्यात मजुरी जमा झाल्याने शेतकर्‍यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाली आहे. शासनाच्या योजनेसाठी तालुक्यातील अनुसूचित जाती-जमाती, दारिद्य्र रेषेखालील इतर कुटुंबे, स्त्री व दिव्यांग कुटुंबप्रमुख कुटुंबे, प्रधानमंत्री आवास योजना, पारंपरिक वनवासी प्रवर्गातील ऑनलाईन जॉब गेल्या सहा वर्षात तालुक्यातील दीडशेहून अधिक गावांमधील २२८५.७५ हेक्टर क्षेत्रात आंबा, काजू, नारळ, चिकू, साग आदी वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. यासाठी ३५२८ मजुरांना ११ कोटी ८४ लाख १ हजार ८७९ रुपयांचा शासनाचा निधी खर्ची पडला.
२०१८-१९ मध्ये ४३४.८० हेक्टर क्षेत्रावर ६१९ मजुरांनी लागवड केली. यासाठी १ कोटी ८० लाख ४६ हजार २६ रुपयांचा निधी खर्ची पडला. २०१९-२० मध्ये ७४९ मजुरांनी ५६१.९५ हेक्टर क्षेत्रावर २ लाख २५ हजार ३३९ रुपये खर्ची पडले. २०२०-२१ मध्ये ३८१.४५ हेक्टर क्षेत्रावर ६२९ लाभार्थी मजुरांनी लागवड केली. यासाठी १ कोटी ७२ लाख ७४५ रुपये खर्ची पडले. २०२१-२२ मध्ये ५९५ मजुराने ३५६.२५ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली. यासाठी २ कोटी ८४ लाख ८७ हजार २३८ रुपयांचा निधी खर्ची पडला. २०२२-२३ मध्ये २६०.७० हेक्टर क्षेत्रावर ४२४ मजुरांनी लागवड केली. यासाठी १ कोटी ६९ लाख ८ हजार ८३६ रुपयांचा निधी खर्ची पडला. २०२३-२४ आर्थिक वर्षात २६ डिसेंबर अखेरपर्यंत ५१२ लाभार्थी मजुरांनी २९०.६० हेक्टर क्षेत्रावर लागवड केली. त्यासाठी १ कोटी ४२ लाख ३३ हजार ६९५ रुपयांचा निधी खर्ची पडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com