बलस्थाने राणेंना तारणार की, राऊतांना

बलस्थाने राणेंना तारणार की, राऊतांना

rat१२p१.jpg
८३०८६
रत्नागिरीः मतदानासाठी मतदान केंद्रावर मतदारांची उपस्थिती.
rat१२p२.jpg
८३०८८
मतदारांना सहकार्य करणारे महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते.
rat१२p४.jpg
८३०८९
सायंकाळच्या सत्रात रत्नागिरीतील केंद्रांवर झालेली गर्दी.
-----------------

सकाळ विशेष---------लोगो

इंट्रो...

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या निकालाकडे कोकणासह राज्याचे लक्ष राहणार आहे. नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी थेट लढत आहे. एकूणच झालेल्या ६२.५१ टक्के मतदानाचा फायदा कोणाला होणार, याबाबत वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. विशेषकरून नारायण राणे यांना मोदीकार्ड, भाजप पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि राणे अशी चौरंगी ताकद अन् राणे यांची ही शेवटची निवडणूक असल्याने त्याबद्दल असलेल्या सहानुभूतीचा फायदा होईल, असे बोलले जाते तर विनायक राऊत यांना दोन्ही जिल्ह्यातील मजबूत शिवसेना, भाजपविरोधात असलेले मुस्लिम मतदान, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असलेली सहानुभूती आणि जिल्ह्यातील कुणबी फॅक्टर, सामंत कुटुंबीयातील दुफळी राऊतांना ताकद देणारी ठरेल का? की, यापैकी कोणती बलस्थाने प्रभावी ठरणार अन् कोणाला तारणार? याची राजकीय चर्चा आता रंगत आहे.
- राजेश शेळके, रत्नागिरी
-------------

बलस्थाने राणेंना तारणार की, राऊतांना

निवडणुकीचा धुरळा होतोय शांत; दावे विरले, आता अंदाज

इंट्रो

लोकसभेच्या या मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात ९ उमेदवार आहेत. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे शिवसेनेचे मावळते खासदार विनायक राऊत आणि महायुतीतर्फे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात मुख्य लढत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३ असे मिळून सहा विधानसभा मतदार संघ आहेत. यामध्ये चार मतदार संघामध्ये महायुतीचे आमदार आणि त्यापैकी दोघे कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे राजकीय पटलावर तरी महायुती म्हणजे राणे हे वरचढ असल्याचे चित्र आहे; परंतु अंडरकरंट काही वेगळाच वाहत असल्याची जोरदार चर्चा आहे. आता त्याबाबत मतदानानंतर उघडपणे बोलले जात आहे. निवडणुकीचा धुरळा शांत होत आहे. प्रचारकाळात झालेले आरोप-प्रत्यारोप आणि केलेले अवास्तव दावे हळूहळू विरत चालले असून, आता अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यापैकी काही खासगीत वेगळे अन् जाहीर मुखवटे वेगळे अशी स्थिती आहे.
-----------

चिपळूणमध्ये निकमांचे नेटाने काम...

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण-संगमेश्वर मतदार संघाने चांगली कामगिरी बजावली आहे. येथे अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांनी सुरवातीपासून राणे यांचा प्रामाणिक प्रचार केला. माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्याबाबतच्या नाराजीचा फायदा गेल्या वेळी शेखर निकम यांना झाला होता; परंतु अखेरच्या क्षणात त्यांचे कार्यकर्ते आणि मतदार त्याबाबत उदासीन असल्याचे चित्र होते. दुसरीकडे या मतदार संघातून विधानसभेसाठी इच्छुक असलेले शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत यादव यांनी राऊत यांच्या प्रचारासाठी जोरदार काम केले. त्यामुळे तालुक्यातील आपल्या स्थानाला धक्का लागेल, या जाणिवेने निकम सावध झाले आणि शेवटच्या दोन दिवसात त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लावून आपल्या हक्काच्या वाड्यावस्त्यांवर राजकीय रसद पोहोचवली. भाजप आणि राणे यांनीही त्यांना चांगली साथ दिली. त्यामुळे या मतदार संघातून राऊत यांना मिळणारी आघाडी कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
---------------

मंत्र्यांचे प्रामाणिक काम...

रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून महायुतीच्या उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्य मिळणार, हे राणेंना अपेक्षित आहे. राज्याच्या मंत्रीमंडळातील राजकीय वजन असलेले मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी त्या दृष्टीने व्यक्तीगत प्रामाणिक प्रयत्न केले. शहरी भागात भाजपचा पारंपरिक मतदार झाडून बाहेर पडला. त्यामुळे शहरामध्ये राणे यांना चांगले मतदान होण्याचा अंदाज आहे. मुस्लिम मतदार मात्र भाजपच्या विरोधात असल्याने त्याचा फायदा विनायक राऊत यांना झाल्याचे बोलले जाते. उदय सामंत यांच्या हाकेला ग्रामीण भागातील कार्यकर्ते आणि मतदार कितपत साथ देणार, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. तालुक्यासह कोकणातील राजकारणात माहीर असलेले किंगमेकर त्यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत जवळजवळ दिवसभर ‘नॉट रिचेबल’ राहिल्याने कार्यकर्त्यांच्या वर्तुळात संभ्रम निर्माण झाला होता. त्याचाही फटका राणे यांना बसण्याची शक्यता महाआघाडीचे नेते जाहीरपणे सांगू लागले आहेत.
--------------

साळवी-लाडांची मताधिक्यासाठी झुंज

जिल्ह्यातील तिसरा मतदार संघ म्हणजे लांजा-राजापूर हा आहे. या एकमेव मतदार संघात ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी झुंजत आहेत. साळवी यांच्यामागे गेल्या काही महिन्यांपासून सरकारने प्रतिबंधक खात्याचे शुक्लकाष्ट लावले असल्याने पक्षाच्या पाठिंब्याची त्यांना नितांत गरज आहे. त्यामुळे राणे यांच्याशी जुने संबंध असले तरी साळवी यांनी या निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केले असावे, असा अंदाज आहे. त्यांच्या जोडीला काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभेचे इच्छुक अविनाश लाड यांनी जास्तच जोर लावल्यामुळे या मतदार संघात राऊत यांना आघाडी मिळेल, अशी अपेक्षा आहे.
--------------

कणकवलीत मताधिक्याची अपेक्षा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघांपैकी कणकवली हा राणे कुटुंबाचा हक्काचा मतदार संघ आहे. कारण, तिथे त्यांचे धाकटे चिरंजीव नीतेश राणे हे आमदार म्हणून चांगल्याप्रकारे काम करत आहेत. त्यामुळे येथून सर्वांत जास्त मताधिक्याची त्यांना अपेक्षा आहे. ती पूर्ण व्हावी, असे वातावरण आहे.
----------------

सावंतवाडीत काय होणार...?

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर महायुतीचे सावंतवाडीतील मंत्री आहेत. येथूनही राणे यांना चांगलं मताधिक्य मिळेल, अशी आशा राणे यांना आहे; पण जिल्ह्यातील भाजपचे नेते राजन तेली, केसरकर आणि राणे यांचे एकमेकांशी फारसे जुळत नाही शिवाय, गेली काही वर्षे एकमेकांचे राजकीय स्पर्धक असलेले केसरकर आणि राणे यांनी निवडणुकीच्या तोंडावर राजकीय स्वार्थासाठी एकमेकांची गळाभेट घेतल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना रूचलेले नाही. त्याचा परिणाम मतदानावर होणार आहे तसेच या मतदार संघात ख्रिश्चन मतदारही मोठ्या संख्येने आहेत. देशातील बदललेल्या राजकीय, सामाजिक वातावरणात ते कमळाचे बटन दाबण्याची शक्यता कमी आहे.
------------

वैभव नाईक राऊतांना आघाडी देणार ?

कुडाळ-मालवण या एकमेव विधानसभा मतदार संघात ठाकरे गटाकडे आहे. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक येथे आमदार आहेत. वेळप्रसंगी जीवाची बाजी लावून राणे कुटुंबीयांशी राजकीय लढाई लढत आहेत. त्यामुळे या मतदार संघातून ते राऊत यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार, हे सांगण्याची गरज नाही.

---------------
जिल्ह्यात २८ हजार मतदान अधिक

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या अंतिम आकडेवारीनुसार, सिंधुदुर्ग जिल्हा मतदानाच्या टक्केवारीमध्ये वरचढ दिसत आहे; पण या दोन जिल्ह्यांमधील मतदानाची आकडेवारी पाहिली तर रत्नागिरी जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघांमध्ये मिळून एकूण ४ लाख ६८ हजार १९९ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४ लाख ३९ हजार ४१९ मतदान झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे २८ हजार मतदान जास्त झाल्याचे दिसून येते. त्यामुळे राणे आणि राऊत यांचे जी बलस्थाने कोणाला तारणार, हे पाहावे लागणार आहे.
------------
दोन्ही उमेदवारांना विजयाची खात्री

लोकसभेच्या निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी आपलाच विजय होणार, असा दावा केला आहे तर महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी तर दोन ते अडीच लाखाच्या फरकाने आपण निवडून येऊ, असा विश्वास व्यक्त केला आहे.

----------

चौकट

विधानसभा मतदार संघनिहाय मतदान

चिपळूण - १ लाख ५५ हजार ०२७ (५७.४६ टक्के)
रत्नागिरी – १ लाख ७२ हजार १३९ (६०.७१ टक्के)
राजापूर – १ लाख ४१ हजार ३३ (६०.३४ टक्के)
कणकवली - १ लाख ५० हजार ३२० (६६.०१ टक्के)
कुडाळ – १ लाख ३९ हजार ८५६ (६५.८६ टक्के)
सावंतवाडी – १ लाख ४९ हजार २४३ (६६.४९ टक्के)

-----------
rat१२p९.jpg
83094
नारायण राणे

कोट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चांगल्या कामामुळे देशभरात भाजपला चांगले वातावरण आहे. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात कमळ फुलणार, हे निश्चित आहे. दोन्ही जिल्ह्यात भाजपच्या प्रचारसभांना चांगला प्रतिसाद मिळाला. जनतेचे प्रेम अनुभवता आल्यामुळे माझा विजय निश्चित आहे.
- नारायण राणे, उमेदवार भाजप

------------------
rat१२p८.jpg-
83093
विनायक राऊत

कोट
दोन्ही जिल्ह्यात सुसंस्कृत राजकारणाला मतदार अधिक पसंती देतात. मतदानादिवशी मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा अनुभवयास मिळाला. त्यामुळे मी अडीच लाखाच्या फरकाने निवडून येणार यात शंकाच नाही.
- विनायक राऊत, उमेदवार, शिवसेना ठाकरे गट

-----
rat१२p५.jpg-
83090
उदय सामंत

कोट
महायुती म्हणून लोकसभेला सर्वांनी चांगले काम केले आहे. अबकी बार ४०० पार, हा नारा घेऊन सर्वजण लढत आहेत. त्यामुळे नारायण राणे यांचा लोकसभा मतदार संघ विजय होणार, यात शंकाच नाही.
- उदय सामंत, पालकमंत्री, रत्नागिरी जिल्हा

------
rat१२p६.jpg-
83091
प्रदीप उर्फ बंड्या साळवी

कोट
रत्नागिरी विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना या मतदार संघातून कमीत कमी २५ ते ३० हजार मताधिक्य आम्ही देणार. महाविकास आघाडी असल्याने राष्ट्रवादी, काँग्रेसची मते, मुस्लिम समाजाची मते मशाल चिन्हालाच होणार. त्यामुळे १०० टक्के आम्ही मताधिक्य घेऊन येणार.
- प्रदीप उर्फ बंड्या साळवी, उबाठाचे रत्नागिरी तालुकाप्रमुख
------
rat१२p७.jpg
83092
सचिन वहाळकर

कोट

रत्नागिरी, चिपळूण विधानसभा मतदार संघामध्ये आम्ही आघाडी घेऊ. राजापूर मतदार संघात समान असेल; परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघामध्ये चांगले मताधिक्य राणे यांना मिळेल. मुस्लिम मतदार सुमारे १ लाख २० हजार आसपास आहेत. त्यापैकी १४ हजार सिंधुदुर्गमध्ये तर उर्वरित रत्नागिरीत आहे. त्यापैकी अनेक केंद्रावर काही प्रमाणात तरी आम्हाला मतदान होईल. भाजप म्हणून आमचीही ताकद वाढली आहे. त्यामुळे नारायण राणे यांचा विजय निश्चित आहे.

- सचिन वहाळकर, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा

------------------------

विनायक राऊत यांना अनुकूल काय ?

* ठाकरे शिवसेनेविषयी सुप्त सहानुभूतीची
* मुस्लिम मतदारांचा कल भाजपविरोधी
* भाजपचा वाढलेला टक्का किती वाढला ?
* ख्रिश्चन समाजाची मते आघाडीकडे शक्य
* दलित मतदारांचा कलही भाजपविरोधात

---------
नारायण राणे यांना अनुकूल काय ?

* ३ मंत्री,२ आमदार, माजी आमदारांची फळी
* कोकणचे नेतृत्व म्हणून राणे यांची क्रेझ
* विविध राजकीय पक्षात राणेंना मानणारे नेते
* राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांमुळे झालेले वातावरण
* राममंदिर, ३७० कलम हटवल्याने खुश झालेला वर्ग

----------------
(टीप- स्वतंत्र चौकटीत वापरणे....)

बदलत्या भूमिका अन् बदललेले मुखवटे

इंट्रो

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघासह रायगड लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार लढत झाली. रायगडमध्ये सुनील तटकरे व अनंत गीते यांच्यात संघर्षाचा सामना रंगला. या लोकसभा निवडणुकीनिमित्ताने अनेक उलथापालथी घडल्या. ज्यांनी सातत्याने विरोधकांवर टीकेची झोड उठवली, राजकीय संघर्ष केला त्यांनाच जवळ करत प्रचार करावा लागल्याचे पाहायला मिळाले. राजकीय संघर्ष हा कायमचा नसतो, हेही या निमित्ताने दिसून आले. यामुळे बदलत्या भूमिका अन् घातलेले मुखवटे मतदारांना अनुभवायला मिळाले. या आधीच्या निवडणुकांपेक्षा या वेळी ही करमणूक कितीतरी अधिक होती.

- नागेश पाटील, चिपळूण
---------------------------
लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात उमेदवारीसाठी महायुतीकडून चर्चेच्या फेऱ्या सुरू असतानाच आयत्यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. परिणामी, एकेकाळचे विरोधक असलेल्या उद्योगमंत्री उदय सामंत व उद्योजक किरण सामंत यांना नारायण राणेंच्या प्रचारासाठी काम करावे लागले. महायुती म्हणून त्यांनी हातात हात घालून काम केले तरी आयत्यावेळी तळागाळात कितीजणांनी हात दाखवला असेल, याची मोजदाद बूथनिहाय मतदान हाती आल्यावर करणे शक्य होईल. जिल्हाभरातील विविध दुसऱ्या फळीतील नेत्यांच्या समर्थकांना मिळालेल्या निरोपाप्रमाणे त्यांनी काम केले. हे निरोप काय होते ते गुलदस्त्यात होते, आता ते चर्चेत बाहेर येऊ लागले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांचीही या निवडणुकीत कसोटी लागली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कधी भाजपचा प्रचार केला नव्हता; मात्र महायुतीमुळे त्यांना तो नाइलाजास्तव करावा लागला. माजी आमदार रमेश कदम व आमदार भास्कर जाधव यांच्यातील राजकीय संघर्ष संपूर्ण जिल्ह्याने अनुभवला. अनेक वर्षे या दोघांमध्ये काँटेकी टक्कर सुरू होती; मात्र आमदार निकमांनी शरद पवारांचा हात सोडल्याने रमेश कदम शरद पवारांसोबत राहिले. त्याचा परिपाक म्हणून लोकसभेसाठी रमेश कदम, आमदार जाधव यांनी गळ्यात गळे घालून राऊत यांचा प्रचार केल्याचे चित्र दिसले. दापोली विधानसभा मतदार संघातही माजी आमदार सूर्यकांत दळवी आणि शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांच्यात राजकीय वैमनस्य सातत्याने निर्माण झालेले होते. एकमेकांना आव्हाने-प्रतिआव्हानेही देण्यात आली होती; मात्र सरतेशेवटी झाले गेले विसरून हे दोघेही नेते महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यासाठी प्रचारात गुंतले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेसाठी महायुतीला पाठिंबा जाहीर केला होता. तरीदेखील खेड शहर आणि तालुक्यात मनसेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी रामदास कदमांविरोधात डरकाळ्या फोडल्या; मात्र त्यांनाही सरतेशेवटी तलवार म्यान करून महायुतीचा प्रचार करावा लागला. या लोकसभा निवडणुकीनिमित्ताने नेत्यांचे रूसवेफुगवेही मतदारांना पाहायला मिळाले. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात होते; मात्र जनतेची करमणूक झाली.
......................
कोट
परिस्थितीनुसार राजकारण बदलत असते त्याचबरोबर राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो, हे देखील महाराष्ट्राने अनुभवले आहे. अनेकदा अपरिहार्यतेमुळे राजकीय भूमिका नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना बदलाव्या लागतात.
- शौकतभाई मुकादम, माजी सभापती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com