महाराष्ट्रातील ब्राह्मणांवर विद्वानांकडून अभ्यास

महाराष्ट्रातील ब्राह्मणांवर विद्वानांकडून अभ्यास

महाराष्ट्रातील ब्राह्मणांवर विद्वानांकडून अभ्यास
प्रा. डॉ. अरविंद कुलकर्णी; देवरुखात ब्राह्मण सेवा संघाचा मेळावा
साडवली, ता. १२ : ‘‘भारतातील ब्राह्मण आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातील ब्राह्मण हा परदेशी विद्वानांचा अभ्यासाचा विषय झाला आहे. त्यामुळे सचोटी, बुद्धिमत्ता, प्रामाणिकपणा, अभ्यासूवृत्ती, प्रखर राष्ट्रनिष्ठा, प्रखर धर्मनिष्ठा या सद्‍गुणांमुळेच स्वातंत्र्य लढ्यात ब्राह्मणांना योगदान देता आले. या सर्वांचा अभ्यास केला पाहिजे,’’ असे प्रा. डॉ. अरविंद कुलकर्णी यांनी सांगितले.
अक्षय्य तृतीया आणि भगवान परशुराम जयंतीचे औचित्य साधून देवरूख येथे ब्राह्मण सेवा संघाच्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. सुरवातीला भगवान परशुराम आणि आद्य शंकराचार्य यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. श्री गणेश पाठशाळेच्या विद्यार्थ्यांनी वेदपठण केले. विनय पानवलकर यांनी दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजनाचा शास्त्रार्थ सांगितला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ब्राह्मण सेवा संघाचे माजी अध्यक्ष भास्कर नरहर तथा अण्णा शहाणे यांची एकमताने निवड करण्यात आली. याप्रसंगी ‘ब्राह्मण संघटन गरज आणि कार्यपद्धती’ यावर प्रा. कुलकर्णी यांनी विचार मांडले.
ब्राह्मणांनी देशासाठी आणि समाजासाठी केलेला त्याग अतुलनीय आहे. आर्य चाणक्यांपासून प्रतापसूर्य बाजीराव पेशवे यांच्यापर्यंत, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ब्राह्मणांचे योगदान त्यांनी सांगितले. सचोटी, बुद्धिमत्ता, प्रामाणिकपणा, अभ्यासूवृत्ती, प्रखर राष्ट्रनिष्ठा, प्रखर धर्मनिष्ठा या सद्‍गुणांमुळेच हे योगदान ब्राह्मणांना देता आले. या सर्वांचा अभ्यास केला पाहिजे. भारतातील ब्राह्मण आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातील ब्राह्मण हा परदेशी विद्वानांचा अभ्यासाचा विषय झाला आहे, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर विनय वसंत पानवळकर यांचे ‘भगवान परशुराम यांचे कार्य आणि ब्राह्मणांचे आचरण’ यावर मार्गदर्शन झाले. धर्माच्या रक्षणासाठी ब्राह्मण संघटन, एकजूट, आचरण महत्त्वाचे आहे, असे पानवळकर यांनी नमूद केले. याप्रसंगी आगामी तीन वर्षांसाठी नवीन कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com