‘दशावतार’ म्हणजे लोककलेचे नवांकुर

‘दशावतार’ म्हणजे लोककलेचे नवांकुर

83153
सावंतवाडी ः ‘दशावतार कला आणि अभ्यास’ पुस्तकाचे प्रकाशन करताना राजेसाहेब खेमसावंत भोसले, राणीसाहेब शुभदादेवी भोसले, लेखक प्रा. विजयकुमार फातर्पेकर, संजीव सुवर्ण, अभिषेक जाखडे, डी. टी. देसाई, श्री. सावंत, प्राचार्य डी. एल. भारमल, सीमा मराठे आदी.

‘दशावतार’ म्हणजे लोककलेचे नवांकुर

प्रा. फातर्पेकर ः ‘दशावतार कला आणि अभ्यास’ पुस्तकाचे प्रकाशन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ ः दशावतार म्हणजे ग्रामीण जीवनातील लोककलेला फुटलेले अंकुर. गेली ५३ वर्षे दशावतार कलेचा अभ्यास करत असताना कर्नाटक-उडपी येथील यक्षगान अभ्यासले आहे. माझे पहिले पुस्तक ‘यक्षगान’ प्रकाशित झाले असून, आता ‘दशावतार’ पुस्तक प्रसिद्ध होत आहे. दशावतारी कलेवर आकर्षित होऊन मी अभ्यासपूर्वक या पुस्तकाचे लेखन केले आहे. यक्षगान अभ्यासताना जी माहिती गोळा केली, ती दशावतार कलेसाठी देखील उपयोगी ठरली. दशावतार आणि यक्षगान या लोककला स्वतंत्र असल्या तरी त्या लोकांना भावतात, असे प्रतिपादन प्रा. विजयकुमार फातर्पेकर यांनी येथे केले.
प्रा. फातर्फेकर लिखित व पद्मगंधा प्रकाशन, पुणे प्रकाशित ‘दशावतार कला आणि अभ्यास’ या पुस्तकाचे प्रकाशन ऐतिहासिक राजवाडा येथे एका शानदार सोहळ्यात करण्यात आले. सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब खेमसावंत भोसले, राणीसाहेब शुभदादेवी भोसले आदींच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला. ‘दशावतार कला आणि अभ्यास’ हे पुस्तक कोकणच्या ‘दशावतार’ कलेवर आधारित आहे. याचे प्रकाशन शनिवारी (ता. ११) सायंकाळी करण्यात आले. याप्रसंगी नाटककार, लेखक प्रा. विजयकुमार फातर्पेकर, यक्षगान केंद्राचे संस्थापक संजीव सुवर्ण, अभिषेक जाखडे, डी. टी. देसाई, श्री. सावंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, प्राचार्य डी. एल. भारमल, सीमा मराठे, प्रा. पद्मा फातर्पेकर आदी उपस्थित होते.
.............
चौकट
‘यक्षगान’ नाटकास उत्स्फूर्त प्रतिसाद
पुस्तक प्रकाशनानंतर कर्नाटकी कलावंतांनी ‘यक्षगान’ नाटकाचा प्रयोग मराठीतून सादर केला. कर्नाटक-उडपी येथील यक्ष संजीव यक्षगान केंद्राचे प्रमुख आचार्य व संस्थापक संचालक गुरू संजीव सुवर्णा आणि त्यांच्या शिष्यगणांनी हा प्रयोग सादर केला. याला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. पावसाच्या व्यत्ययामुळे खुल्या पटांगणात होणारा हा प्रयोग बंदिस्त सभागृहात पार पडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com