संगमेश्वर-सिद्धांत चव्हाण यांच्या चित्रांचे प्रदर्शन

संगमेश्वर-सिद्धांत चव्हाण यांच्या चित्रांचे प्रदर्शन

rat12p22.jpg
83159
रत्नागिरीः चित्रप्रदर्शनाच्या उद्‍घाटनाप्रसंगी उपस्थित मान्यवरांसह सिद्धांत चव्हाण.
rat12p2३.jpg
83160
रत्नागिरीः चित्र प्रदर्शन पाहताना कलाप्रेमी.
rat12p22.jpg-
83161
सिद्धात चव्हाणचे प्रदर्शनातील सुंदर चित्र.
-----------
सिद्धांत चव्हाण यांच्या चित्रांचे प्रदर्शन
प्रज्योत आर्ट गॅलरीत उदघाटन; १८ पर्यंत खुले
संगमेश्वर, ता. १२ः रत्नागिरी येथील युवा चित्रकार सिद्धांत दीपक चव्हाण यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन डॉ. प्रत्युष चौधरी यांच्या प्रज्योत आर्ट गॅलरीत सुरू झाले आहे. १८ मेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील कलारसिकांनी या प्रदर्शनाला सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत भेट द्यावी, असे आवाहन प्रज्योत आर्ट गॅलरीतर्फे केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील कलाकार आणि कला रसिकांसाठी डॉ. प्रत्यूष चौधरी यांनी रत्नागिरी येथे प्रज्योत आर्ट गॅलरीची उभारणी केली आहे. जिल्ह्यात अनेक कलाकार आणि शिल्पकार आहेत. मात्र त्यांना आपल्या कलाकृतींचे प्रदर्शन करण्यासाठी जागेची उपलब्धता नव्हती. कलाकारांची ही अडचण लक्षात घेऊन डॉ. प्रत्युष चौधरी यांनी रत्नागिरीतील टीआरपीदील मित्र संकुलमध्ये प्रज्योत आर्ट गॅलरीची उभारणी केली आहे. या गॅलरीची क्युरेटर म्हणून युवा चित्रकार मयुरी घाणेकर ही काम पाहत आहे. तसेच सिद्धांत चव्हाण हा या गॅलरीचा चित्रकार म्हणून सध्या काम करत आहे.
सिद्धांत घाणेकर याचे कलाशिक्षण देवरुख कला महाविद्यालयामध्ये झाले. त्याने बॅचलर ऑफ फाईन आर्टची पदवी प्राप्त केली आहे. सिद्धांतने यापूर्वी रत्नागिरी आणि मुंबई येथील कला प्रदर्शनात ग्रुप शो मध्ये सहभाग घेतला होता. तसेच त्याने डिसेंबर २०२३ रोजी ‘काळा घोडा’ येथेही सहभाग नोंदवला होता. रत्नागिरीमध्ये उभारण्यात आलेल्या प्रज्योत आर्ट गॅलरीत आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्याचे सिद्धांतने ठरवले. १२ मे रोजी त्याचे उदघाटन डॉ. प्रत्युष चौधरी, कलाशिक्षक रुपेश पंगेरकर, क्युरेटर मयुरी घाणेकर, सिद्धांतचे सर्व कुटुंबीय आणि कला रसिक यांच्या उपस्थितीत झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com