रायगड मतदारसंघात गतवेळपेक्षा कमी मतदान

रायगड मतदारसंघात गतवेळपेक्षा कमी मतदान

रायगडमध्ये मतदारसंघात
गतवेळपेक्षा कमी मतदान
खेड : रायगड लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुनील तटकरे व उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार अनंत गीते यांच्यात लढत रंगली आहे. या रंगतदार लढतीत गेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानापेक्षा एक टक्का कमी मतदान झाले आहे. कोकणातील मतदरसंघातील तटकरे विरुद्ध गीते ही लढाई महायुती व इंडिया आघाडीने प्रतिष्ठेची बनवली आहे. आघाडीने शेकापचे पाठबळ या निवडणुकीत रायगड गीतेंच्या पाठीशी उभे केले. तटकरे यांनी राज्याच्या राजकीय भूकंपामध्ये बजावलेली महत्त्वाची भूमिका त्यांना आघाडीच्या थेट निशाण्यावर नेणारी ठरली. गेल्या निवडणुकीप्रमाणेच मतदानाची टक्केवारी जवळपास कायम राहिली आहे. त्यामुळे सुनील तटकरे यांना रोखण्याचा अनंत गीते यांच्यासाठी आघाडीने केलेली व्यूहरचना कितपत यशस्वी होते, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात ६०.५१ टक्के मतदान झाले आहे. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ६१.७७ टक्के इतके मतदान झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com