खेडमध्ये प्लास्टिक विरोधातील कारवाई थंडावली

खेडमध्ये प्लास्टिक विरोधातील कारवाई थंडावली

प्लास्टिक विरोधातील
कारवाई थंडावली
खेड : शासनाने प्लास्टिकवर बंदी घातली असली तरी शहरात सर्रासपणे प्लास्टिकचा वापर होत आहे. नगरपालिकेची प्लास्टिक विरोधातील कारवाई थंडावली आहे. यामुळे प्लास्टिक बंदीचा पुरता फज्जा उडाला आहे. शहरातील दुकानांसह विशेषतः स्वीट मार्टच्या दुकानांमध्ये सर्रासपणे प्लास्टिक पिशव्याचा वापर सुरू आहे. नगरपालिकेने काही महिन्यांपूर्वीच प्लास्टिक पिशव्याचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांना दणका देत दंडात्मक कारवाई केली होती. या कारवाईच्या धसक्याने प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले होते. मात्र नगरपालिकेची कारवाईची मोहीम थंडावली आहे. यामुळे व्यावसायिकांचे फावले आहे. मुख्याधिकारी आठवड्यातून एक दोन दिवसच येत असल्याने दैनंदिन कामकाजाचा पुरता बोजवारा उडाला आहे. सर्वच कामे रखडली आहेत. यामुळे दैनदिन कामकाजासाठी पालिकेत जाणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com