आरएचपी फाउंडेशनकडून सुनील यादव याला व्हीलचेअर

आरएचपी फाउंडेशनकडून सुनील यादव याला व्हीलचेअर

rat12p20.jpg
83157
रत्नागिरी : आरएचपी फाउंडेशनतर्फे साठरे बांबरच्या सुनील यादव याला व्हीलचेअर देण्यात आली. या वेळी त्याच्यासोबत संस्थेचे अध्यक्ष सादिक नाकाडे, डॉ. मुस्कान नाकाडे, चंद्रकांत यादव आदी.
-----------
आरएचपी फाउंडेशनकडून
सुनील यादव यांना व्हीलचेअर
रत्नागिरी, ता. १२ : तालुक्यातील साठरे बांबर येथील सुनील चंद्रकांत यादव ( वय २८ वर्षे) याला आरएचपी फाउंडेशनतर्फे नवीन व्हीलचेअर देण्यात आली. आता त्याचे जीवन सुसह्य होणार असून घरी मदत करण्याची त्याची जिद्द आहे.
सुनील यादव हा दहावीचे शिक्षण झाल्यानंतर मोलमजुरी करत होता. २१ वर्षांचा असताना झाडावरून खाली पडला. त्यामुळे त्याच्या पाठीच्या मणक्याला मार लागला. त्याला लगेच रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात आणि त्यानंतर आधी उपचारांसाठी कोल्हापूरच्या रुग्णालयात, तर त्यानंतर मुंबईच्या रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्या मणक्याचे ऑपरेशन झाले; पण त्यानंतर कमरेपासून खालील भागाच्या संवेदना गेल्या, नियंत्रण गेले. सात वर्षांपासून तो जागेवरच आहे. चालता येत नाही. आईच्या मदतीने तो दैनंदिन काम करत होता. मात्र दोन वर्षांपूर्वी आईचे निधन झाल्याने आता वडील आणि सुनील दोघेच असतात. त्यामुळे सर्व जबाबदारी वडिलांवरच आली. वडील मोलमजुरी करून उपजीविका करतात. सकाळी लवकर उठून सुनीलचे आवरतात. जेवण बनवून ठेवतात व कामाला जातात.
हँडीकॅप सर्टिफिकेट काढण्यावेळी समीर नाकाडेंशी त्याची ओळख झाली आणि आरएचपी फाउंडेशनची माहिती मिळाली. संस्थेत त्याने नावनोंदणी केली तेव्हा नवीन व्हीलचेअरची मागणी केली होती. फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे यांनी सुनीलची सर्व माहिती घेतली आणि व्हीलचेअरसाठी देणगीदार मिळवून देण्याची ग्वाही दिली.
श्री. नाकाडे यांचे मित्र जयंत चुणेकर यांनी व्हीलचेअर द्यायचे कबूल केले. त्यांच्या ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शन आणि समुपदेशन कार्याला ६ वर्षे पूर्ण झाली. त्यातून होणारे अर्थार्जन ते समाजकार्यासाठी वापरतात. याचाच एक भाग म्हणून सुनीलला त्यांनी सोयीस्कर फोल्डेबल अशी व्हीलचेअर दिली. या वेळी सादिक नाकाडे, समीर नाकाडे, प्रिया बेर्डे, डॉ. मुस्कान नाकाडे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com