घरगुती वादातून तरुणाची आत्महत्या

घरगुती वादातून तरुणाची आत्महत्या

पान ३

घरगुती वादातून तरुणाची आत्महत्या
रत्नागिरी ः तालुक्यातील हातखंबा येथे तरुणाने घरगुती वादातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना १० मे रोजी रात्री ११ वा.घडली. गुलशन राजकुमार पटेल (वय २२, रा. हातखंबा दर्गा, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गुशलन पटेल हा गेल्या चार महिन्यांपासून रत्नागिरीमध्ये हेल्पर म्हणून कामाला होता. शुक्रवारी रात्री कामावरुन तो दारुच्या नशेत घरी गेला. यावरुन पत्नीशी त्याचा वाद झाला आणि त्याने पत्नीला मारहाण केली. त्यामुळे ती घराबाहेर गेल्याने रागाच्या भरात त्याने राहत्या घरातील छताच्या हुकला जाडसर मफलरने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

फसवणुकीची पाच महिन्यांनी तक्रार
रत्नागिरी ः बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून क्रेडिट कार्डची माहिती घेत महिलेने प्रौढाची तब्बल ४१ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना ४ डिसेंबर २०२३ ला दुपारी १२.३० वा. सुमारास मांडवी येथे घडली होती. याप्रकरणी फिर्यादीने पाच महिन्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. गिरीश भिवा सावंत (५१, रा. मांडवी, रत्नागिरी) असे फिर्यादीचे नाव आहे. पाच महिन्यांपूर्वी महिलेने दुपारच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर फोन केला. तिने आपण एका बँकेतून बोलत असल्याचे सांगून फिर्यादीकडून कार्डचा १६ अंकी नंबर, जन्मतारीख, कार्डची व्हॅलिडिटी अशी माहिती विचारुन घेतली. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत गिरीश सावंत यांनी सर्व माहिती त्या महिलेला दिल्यावर त्यांची ४० हजार ८०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली होती. याप्रकरणी संशयित महिलेविरोधात भादंवि कायदा कलम ४२०,माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com