महामार्गावर संगमेश्वरात वाहतूक कोंडी

महामार्गावर संगमेश्वरात वाहतूक कोंडी

rat12p18.jpg
83122
संगमेश्वर येथे वाहतूक कोंडी झाल्यामुळे उभी असलेली वाहने.
rat12p19.jpg
83123
संगमेश्वर येथे अवजड वाहनेही अडकून पडली होती.
-----------
महामार्गावर संगमेश्वर येथे वाहतूक कोंडी
दोन किमीपर्यंत वाहनांच्या रांगा; पर्यायी मार्ग सुरु करण्याची मागणी
संगमेश्वर, ता. १२ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर येथे झालेल्या वाहतूक कोंडीमध्ये पर्यटकांसह चाकरमानी अडकल्यामुळे भरदुपारी १ ते २ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. संगमेश्वर शास्त्री पूल ते सोनवी पूल दरम्यान वाहने उभी होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी या भागात कायमस्वरूपी वाहतूक पोलिस नेमावा तसेच वाहनांसाठी पर्यायी मार्ग सुरू करण्यात यावा, अशी वाहनचालकांकडून होत आहे.
कोकणात चाकरमान्यांचे आगमन जोरात सुरू झाले आहे. एसटी, खासगी बसेस आणि चारचाकी वाहनांनी चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत. कोकणातील निवडणुकांचे टप्पे पूर्ण झाले असून मुंबईतील मतदानाला वेळ असल्यामुळे चाकरमानी कोकणात ठाण मांडून आहेत. पर्यटकांचीही पावले कोकणाकडे वळू लागल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची गर्दी वाढलेली आहे. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळत आहेत. चौपदरीकरणाचे सुरू असलेले काम आणि अरुंद रस्ता यामुळे संगमेश्वर येथील सोनवी आणि शास्त्री पुलावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. दिवसातून एकदा तरी हा प्रश्न निर्माण होत आहे. पुलापासून सुमारे दोन किमी रांगा लागत आहेत. या गोंधळामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
संगमेश्वर जवळील शास्त्रीपुलापासून दोन किमी अंतरावरील संगमेश्वर बसस्थानकावर पोचण्यासाठी एक तास लागत आहे. सोनवी पुलावरुन दुहेरी वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे ही कोंडी होत आहे. महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवासाचा त्रास आणि वाहतुकीचा वेळ वाढला आहे. मे महिन्याच्या सुट्टीमुळे लाखोंच्या संख्येने मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरातून जादा एसटी बसेस, तसेच खासगी बसेस आणि खासगी गाड्यांमधून चाकरमानी गावात येत आहेत. चौपदरीकरणाचे काम काही ठिकाणी पूर्ण झाले आहे. तेथील रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. मात्र काम सुरू असलेल्या ठिकाणी बायपास केलेले रस्ते आणि जुन्या रस्त्यावर पडलेले प्रचंड खड्डे याचा त्रास वाहनचालकांना होत आहे. त्यामुळे प्रवासाला दोन ते तीन तास अधिक लागत आहेत. मुंबईतून संगमेश्वरला येण्यासाठी सध्या १० तासांहून अधिक काळ लागत असल्याचे बसचालकांनी सांगितले.

चौकट
...तर कोंडी टाळता येईल
चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या तसेच पुलांची कामे करणाऱ्या ठेकेदार कंपनीने वाहतूक सुरळीत करण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करून दिला पाहिजे. जेणेकरून त्याचा त्रास चालकांना होणार नाही. तसेच वाहतूक कोंडीही टाळता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com