शृंगारतळीतील मोबाईल शॉपी चोरट्यांनी फोडली

शृंगारतळीतील मोबाईल शॉपी चोरट्यांनी फोडली

पान १

८३१९४


शृंगारतळीत मोबाईल शॉपीतून
३० लाखांचा ऐवज पळविला
श्वानपथक दाखल ः ९० हजार रोकडचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. १२ ः शृंगारतळी बाजारपेठेतील गोविंदा मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी सुमारे ३० लाखांचा ऐवज आणि ९० हजार रोकड पळविली. ही घटना शनिवारी (ता. ११) मध्यरात्री घडली. श्वान पथकाने चोरट्यांचा माग काढला; परंतु त्याचा अधिक तपशील मिळू शकलेला नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.
शृंगारतळी बाजारपेठेत मुख्य रस्त्याकडेला ही मोबाईल शॉपी आहे. मध्यरात्री या शॉपीचा मागील दरवाजा कटावणीच्या साह्याने तोडून चोरट्यांनी दुकानामध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी कमी किमतीचे मोबाईल तिथेच ठेवले, त्याऐवजी सर्वात महागड्या किमतीचे मोबाईल व टॅब चोरट्यांनी लांबवले. सुमारे ३० लाखांचा हा ऐवज चोरट्यांनी नेला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शॉपीमधील ९० हजार रोकडही लांबवली आहे. दुर्दैवाने चोरीची घटना घडली, त्या दिवशी शॉपीमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. चोरी होण्याच्या एक दिवसापूर्वीच दुकानमालकाने नवीन मोबाईल, टॅब असा उच्च किमतीचा ऐवज विक्रीसाठी आणला होता. चोरट्यांनी किमती मोबाईल चोरल्यामुळे दुकानमालकाला फटका बसला आहे. शॉपीच्या शेजारील औषध दुकानातील कॅमेऱ्यामध्ये चोरट्यांचे फोटो दिसत आहेत. त्यावरून तिघांचा या चोरीत सहभाग घेतल्याचा अंदाज बांधला जात आहे. हा प्रकार रविवारी (ता. १२) सकाळी उघड झाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक प्रमोद मोहिते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ही माहिती वरिष्ठांना दिली. अतिरिक्त जिल्हा पोलिस उपअधीक्षक जयश्री गायकवाड, चिपळूणचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजमाने, गुहागर पोलिस उपनिरीक्षक सुजित सोनावणे यांनी घटनास्थळी भेट देऊन शॉपीची पाहणी केली.


२०११ मध्येही
झाली होती चोरी
चोरट्यांचा माग काढण्यासाठी रत्नागिरीतून श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञही दाखल झाले होते. श्वान हस्तक सुदेश सावंत यांनी माही या श्वानाद्वारे परिसर पिंजून काढला. मात्र, चोरट्यांचा माग सापडला नाही; परंतु घटनास्थळी दोन कटावण्या व एक पोपट पाना आढळला आहे. चोरी केल्यानंतर साहित्य तिथेच टाकून चोरटे पसार झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या शॉपीमध्ये २०११ मध्ये चोरी झाली होती. त्याचा उलगडा दोन वर्षांनी झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com