रिक्षा-मोटारीच्या धडकेत
देवगडमध्ये एकाचा मृत्यू

रिक्षा-मोटारीच्या धडकेत देवगडमध्ये एकाचा मृत्यू

83252
83251
कट्टा ः अपघातग्रस्त रिक्षा आणि मोटार.

रिक्षा-मोटारीच्या धडकेत
देवगडमध्ये एकाचा मृत्यू
तिघे जखमी ः कट्टा येथे दुर्घटना
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १२ ः रिक्षा आणि मोटार यांच्यामध्ये झालेल्या अपघातात रिक्षामधील एका प्रवाशाचा मृत्यू झाला. राजेश विष्णू शेडगे (वय ५२, रा. कट्टा), असे मृताचे नाव आहे. रिक्षाचालकासह आतील दोन प्रवासी व मुलांनाही दुखापत झाली. हा अपघात आज सायंकाळी देवगड-नादंगाव रस्त्यावर कट्टा येथील एका वळणावर घडला. घटनेची येथील पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातातील रिक्षा देवगड-नांदगाव रस्त्यावरून जामसंडे येथून कट्टा गावाच्या दिशेने निघाली होती. कट्टा येथील एका वळणावर समोरून देवगडच्या दिशेने येणाऱ्या मोटारीची आणि रिक्षाची धडक झाली. अपघातानंतर रिक्षा आणि मोटार रस्त्याकडेला खाली गेली. अपघातात राजेश विष्णू शेडगे, त्यांचा मुलगा श्‍लोक राजेश शेडगे, आदीश नागेश करंगुटकर, तसेच रिक्षाचालक अक्षय विवेकानंद कीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे उपचारादरम्यान जखमी राजेश शेडगे यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक विनायक केसरकर, हवालदार महेंद्र महाडिक, हवालदार प्रवीण सावंत, हवालदार संतोष नाटेकर, पोलिस काँस्टेबल विशाल वैजल आदींनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
कट्टा येथील राजेश विष्णू शेडगे हे कुटुंबासह कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास असतात. गावात धार्मिक कार्य असल्याने आज सकाळीच ते कुटुंबासह गावी आले होते. रिक्षाने जामसंडे येथे फॅन खरेदीसाठी गेले होते. तेथून परत घरी कट्टा गावाकडे येण्यासाठी निघाले असता अपघात झाला. जखमी रिक्षाचालक अक्षय विवेकानंद कीर यांना उपचारासाठी अन्यत्र हलवण्यात आले आहे. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळ, ग्रामीण रुग्णालय आणि पोलिस ठाणे परिसरात गर्दी केली होती. रुग्णालयात नातेवाईकांना अश्रू अनावर झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com