शिरंबेत शहीद रघुनाथ पवार यांचे स्मारक

शिरंबेत शहीद रघुनाथ पवार यांचे स्मारक

१७ (टूडे २ साठी)

- rat१३p५.jpg-
२४M८३२७६
शिरंबे ः शहीद जवान रघुनाथ पवार यांच्या अमर जवान स्मारकाचे उद्घाटनप्रसंगी माजी सैनिक व पदाधिकारी.

शहीद रघुनाथ पवार यांचे स्मारक

शिरंबेत माजी सैनिकाची उपस्थितीत उद्घाटन

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ ः संगमेश्वर तालुक्यातील शिरंबे येथील शहीद जवान रघुनाथ बाबूराव पवार यांच्या अमर जवान स्मारकाचे उद्घाटन माजी सैनिकांच्या उपस्थितीत झाले. या वेळी शहीद रघुनाथ पवार यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
शिरंबे गावचे सुपुत्र शहीद पवार हे सियाचिन ग्लेशिआर दोन या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना वयाच्या २५व्या वर्षी शहीद झाले. ज्या ठिकाणी ते देशसेवेचे आपले कर्तव्य बजावत होते त्या पॉइंटवर महाबर्फवृष्टी झाली. बराच काळ ते तिथून बाहेर पडू शकले नाहीत. त्यांच्या डाव्या पायाला बर्फाचे इन्फेक्शन झाले. संपूर्ण डावा पाय निकामी झाला. उपचारादरम्यान त्यांना त्याच ठिकाणी वीरगती प्राप्त झाली. ही घटना १७ जानेवारी १९८७ ला घडली. आपल्या गावातील शहीद जवानाचे नवीन पिढीला स्मरण राहावे यासाठी येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन शहीद पवार यांचे अमर जवान स्मारक उभे केले आहे. या स्मारकाचा उद्घाटन सोहळा झाला. या वेळी उपस्थित मान्यवर व माजी सैनिक अधिकाऱ्यांच्या हस्ते स्मारकाला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यानंतर शहीद पवार यांना सलामी देण्यात आली. या प्रसंगी माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हा माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी कॅप्टन चाळके, सुभेदार आत्माराम कदम, जिल्हा संघटनेचे सचिव गणेश सुर्वे, चिपळूण तालुका संघटनेचे सचिव उमेश महाडीक, मनोज पालांडे आदी उपस्थित होते. शिरंबेवासियांनी माजी सैनिकांचा यथोचित सत्कार केला. या कार्यक्रमाने ग्रामस्थ, उपस्थित मान्यवर भारावून गेले. या निमित्ताने शहीद पवार यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com