महाळुंगे-राणेवाडी शाळेचा अमृत महोत्सव उत्साहात

महाळुंगे-राणेवाडी शाळेचा अमृत महोत्सव उत्साहात

swt1311.jpg
83330
देवगडः महाळुंगे-राणेवाडी शाळेच्या अमृत महोत्सव सोहळ्यात माजी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. (छायाचित्र : एन. पावसकर)

महाळुंगे-राणेवाडी शाळेचा
अमृत महोत्सव उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १३ : महाळुंगे-राणेवाडी (ता. देवगड) शाळेचा अमृत महोत्सव सोहळा विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा झाला. यानिमित्त गावात शोभायात्रा व ग्रंथदिंडी काढण्यात आली. या दिंडीत ढोल पथक, छत्रपती शिवाजी महाराज व मावळे वेशभूषा केलेले विद्यार्थी, पारंपरिक वेशभूषा केलेल्या महिला-पुरुषांनी सहभाग घेतला. विविध कार्यक्रमांनी हा महोत्सव पार पडला.
या कार्यक्रमाला उपस्थित माजी शिक्षकांची पाद्यपूजा विद्यार्थ्यांनी केली. प्रमुख अतिथी डॉ. गणेश उर्फ भाई बांदकर, पत्रकार गणेश चव्हाण, अमृत महोत्सव समिती अध्यक्ष संदीप राणे, सुरेश राणे, जिवाजी राणे, रवींद्र सावंत, सुवर्णा घाडीगांवकर, मुख्याध्यापक सुनील मांजरेकर, ग्रामविकास मंडळाचे प्रकाश काशिराम राणे, मोहन घाडीगावकर, सरपंच संदीप देवळेकर, उपसरपंच भक्ती घाडीगावकर, ग्रामसेवक शामसुधिन साटविलकर, कुमार राणे, दशरथ राणे, सोनुआपा सावंत उपस्थित होते.
प्रास्ताविक रामकृष्ण राणे यांनी केले. महिलांसाठी हळदीकुंकू व फनी गेम्स शो नंदा राणे यांनी सादर केला. सायंकाळी भजने व माजी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा झाला. रात्री माजी विद्यार्थ्यांनी मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारत घाडी, प्रसाद राणे, नीलेश यादव, शशिकांत मेस्त्री, रवींद्र सावंत, संतोष राणे, सुमित राणे, आकांक्षा राणे, दिव्या राणे, प्राची घाडीगावकर, सुवर्णा घाडीगावकर, सुरेखा मोहिते, प्रकाश वाडकर, प्रेरणा अनभवने यांनी सहकार्य केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com