अनिकेत वालावलकरांची संपर्कप्रमुखपदी निवड

अनिकेत वालावलकरांची संपर्कप्रमुखपदी निवड

swt1312.jpg
83337
अनिकेत वालावलकर

अनिकेत वालावलकरांची
संपर्कप्रमुखपदी निवड
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १३ः तालुक्यातील वालावल येथील अनिकेत वालावलकर यांची सहकार भारतीच्या वतीने ठाणे महानगर जिल्ह्यासह रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. सहकार भारतीच्या मुख्य कार्यालयात झालेल्या प्रदेश बैठकीत ही नियुक्ती करण्यात आली. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील सहकारातील विविध विषयांना वालावलकर हे आपले अनुभवी नेतृत्व, संघटन बांधणी व व्यवस्थापकीय कौशल्य वापरून न्याय देतील, असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे. वालावलकर हे लक्ष्मीनारायण ट्रस्ट, वालावलचे विश्वस्त देखील आहेत. कोकणात सहकार क्रांती रुजविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा मानस यावेळी वालावलकर यांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com