पावस-नालेवठारमधील महिलांची पाण्यासाठी वणवण

पावस-नालेवठारमधील महिलांची पाण्यासाठी वणवण

rat13p16.jpg
83357
पावसः नालेवठार येथे पाणीपुरवठा करण्यात येणारी विहीर.
rat13p17.jpg
83358
नालेवठार भागासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाण्याची पातळी घटली आहे.
------------
नालेवठारमधील महिलांची पाण्यासाठी वणवण
विहिरीतील पाणीपातळी घटली; तीन वाड्यांचा पाणीप्रश्न गंभीर
पावस, ता. १३ः पावस नालेवठार या भागासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या नळपाणी योजनेच्या विहिरीची पातळी घटत चालल्याने या भागाला चार ते पाच दिवसांनी थोडे थोडे पाणी मिळत असल्याने परिसरातील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
नालेवठार हे महसूल गाव असून, डोंगरउतारावर वसलेले गाव आहे. या गावांमध्ये तीन वाड्यांचा समावेश आहे. दरवर्षी या गावातील तिन्ही वाड्यांना मे महिन्यामध्ये पिण्याच्या पाण्याची परिस्थिती कठीण असते. यासाठी सन २०१० मध्ये जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत तत्कालीन सरपंच यांनी या तीन वाड्यांसाठी एक स्वतंत्र खांबडवाडी येथे स्वतंत्र नदीमध्ये विहीर पाडण्यात आली आणि त्याचे पाणी या तीन वाड्यांना पुरवले जात आहे; परंतु मे महिन्यामध्ये या विहिरीच्या पाण्याची पातळी घटत असल्यामुळे या तिन्ही वाडीमध्ये पिण्याच्या पाणीयोजनेचे पाणी मिळणे कठीण होते. चार ते पाच दिवसांनी पाणी विहिरीमध्ये साठल्यानंतर सोडले जाते; परंतु लोकसंख्येच्या तुलनेमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नाही. जेमतेम पाच ते दहा मिनिटे नळाला पाणी येते. काही ठराविक लोकांनी विंधन विहिरी पाडल्यामुळे काहीजणांना पाणीपुरवठा स्वतःपुरता होतो. त्यामुळे या भागातील महिलांना पायपीट करून पाणी आणावे लागते. त्यामुळे यावर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

चौकट
पाणी घ्यावे लागते विकत
सध्या येथील प्रत्येकावर विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे. टेम्पोच्या माध्यमातून पाणी विकत घ्यावे लागते. याकडे गांभीर्याने लक्ष देणे काळाची गरज आहे. निवडणुकीवेळी आश्वासन देणारे कार्यकर्ते व पुढारी या बाबीकडे लक्ष देत नाहीत, अशी स्थिती आहे. त्यामुळेच पिण्याची पाण्याची समस्या गंभीर बनली आहे.

कोट
दरवर्षी मेमध्ये या तिन्ही वाड्यांमध्ये नळपाणी योजनेच्या पाण्याचा कोणताही उपयोग होत नाही. कारण, या योजनेतून फक्त पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी मिळते व अन्य कोणत्याही महिन्यामध्ये प्रत्येकवेळी पंपाच्याबाबतीत नादुरुस्तीचा पाढा नेहमी वाचला जातो. मे महिन्यामध्ये विहिरीच्या पाण्याची पातळी कमी होत असल्याचे कारण देऊन चार ते पाच दिवसांनी थोडेसे पाणी सोडले जाते. या बाबतीत दरवर्षी होणारी पाण्याची परिस्थिती पाहता ग्रामपंचायतीने ठोस निर्णय करून पिण्याची पाण्याची समस्या दूर करावी जेणेकरून या तिन्ही वाड्यातील पाण्याचा प्रश्न मिटेल.
- संजय नैकर, ग्रामस्थ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com