जिल्हा बँकेचा तीन हजार कोटी ठेवींचा टप्पा पार

जिल्हा बँकेचा तीन हजार कोटी ठेवींचा टप्पा पार

83360
सिंधुदुर्ग जिल्हा बँक

--
83359
मनीष दळवी


जिल्हा बँकेची घौडदौड कायम

मनीष दळवी : तीन हजार कोटी ठेवींचा टप्पा पार

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १३ : जिल्हा बँकेने नुकत्याच संपलेल्या २०२३-२४ या आर्थिक वर्ष अखेर बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावताना ठेवी, कर्जे, एकूण व्यवसाय, कर्ज वसुली, ढोबळ व निव्वळ नफा इत्यादीमध्ये लक्षणीय प्रगती केली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्याच महिन्याच्या (मे) पहिल्या आठवड्यात बँकेने तीन हजार कोटींचा टप्पा ओलांडला असून, बँकेच्या ४० वर्षांच्या यशस्वी वाटचालीत नव्याने मानाचा तुरा खोवला आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा बँकेचे एकूण कामकाज आणि उल्लेखनीय कामगिरीबाबत दळवी यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी विठ्ठल देसाई, प्रज्ञा ढवण, व्हिक्टर डान्टस, बँकेचे सरव्यवस्थापक प्रमोद गावडे यांच्यासह बँकेचे संचालक व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी दळवी म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य बँक असून, या बँकेच्या जिल्ह्यामध्ये ९८ शाखा कार्यरत आहेत. बँकेमार्फत नियमित बँकिंग सेवांसह आरटीजीएस, एनईएफटी, एटीएम, मोबाईल अॅप, आयएमपीएस, युपीआय, ई-कॉम, क्यूआर कोड, एबीपीएस, बीबीपीएस, मायक्रो एटीएम, सीटीएस, ई-मेल अकाऊंट स्टेटमेंट, आदी आधुनिक बँकिंग सुविधा पुरविण्यात येत आहेत. जिल्हा बँकेने नुकत्याच संपलेल्या २०२३-२४ या आर्थिक वर्षअखेर बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावताना ठेवी, कर्जे, एकूण व्यवसाय, स्वनिधी, कर्जवसुली, ढोबळ व निव्वळ नफा, आदींमध्ये लक्षणीय प्रगती केली आहे.
२०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये बँकेने ठेवी, कर्जे, एकूण व्यवसाय, ढोबळ नफा या सर्वच बाबतीत नवीन उद्दिष्टे गाठण्याचा संकल्प केला असून, त्यादृष्टीने सक्षमपणे वाटचाल सुरू आहे. बँकेचा व्यवसाय ३१ मार्च २०२५ अखेर सहा हजार कोटींच्या वर नेण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्हा बँकेवरील ग्राहकांचा व एकंदरीतच जिल्हावासीयांचा बँकेवरील विश्वास व त्यांच्या सहकार्यामुळे बँक सर्व उद्दिष्टे चालू आर्थिक वर्षामध्ये नक्कीच गाठेल, याचा आम्हाला विश्वास आहे. याच दृष्टीने बँकेची वाटचाल सुरू असून, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्याच महिन्यामध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बँकेने तीन हजार कोटींचा ठेवींचा टप्पा ओलांडला आहे. तसेच बँकेचे वसूल भागभांडवलही ५० कोटींपेक्षा जास्त झाले आहे. ३१ मार्च २०२५ अखेर म्हणजेच चालू आर्थिक वर्षअखेर ३३०० कोटींचे ठेव उद्दिष्ट गाठण्याचा बँकेचा मानस असून, जिल्ह्यातील वैयक्तिक तसेच संस्था ठेवीदारांच्या सहकार्याने बँक हे उद्दिष्ट नक्कीच पूर्ण करेल.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘जिल्हा बँक यशस्वीपणे वाटचाल करत असताना जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत कर्जाच्या विविध सुविधा पोहोचविण्यासाठी आग्रही आहे. जिल्ह्यातील महिलांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग राबवून महिलांच्या हाताला काम मिळावे, यासाठी नवीन योजना कार्यान्वित करण्यात येत आहेत. जिल्हा बँकेचे साडेसहा लाख खातेदार असून, सर्व खातेदार कार्यरत राहिले पाहिजे यासाठी जूनध्ये विशेष मोहीम राबवून प्रयत्न केले जाणार आहेत.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com