भोसले इंटरनॅशनल स्कूलचे
सी.बी.एस.ई. परीक्षेत यश

भोसले इंटरनॅशनल स्कूलचे सी.बी.एस.ई. परीक्षेत यश

Published on

83376
सावंतवाडी ः सीबीएसई परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांसह मान्यवर.

भोसले इंटरनॅशनल स्कूलचे
सीबीएसई परीक्षेत यश

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ ः केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल आज दुपारी जाहीर करण्यात आला. येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलने यशस्वी परंपरा कायम ठेवत सलग तिसऱ्या वर्षी १०० निकाल देण्यात यश मिळविले.
शाळेमधून ४२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यापैकी ९० टक्क्यांहून अधिक गुणांच्या ए-वन श्रेणीत ७ विद्यार्थी, ८० टक्क्यांहून अधिक गुणांच्या ए-टू श्रेणीत १० विद्यार्थी व ७० टक्क्यांहून अधिक गुणांच्या बी-वन श्रेणीत १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ९० टक्क्यांहू अधिनक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आर्यन हिर्लेकर (९५.३३), ऋतुजा गावडे (९३.८३), ऋषी लेले (९३.३३), तन्मय कुमार (९२.३३), शौनक नर (९२.१७), स्वरांगी आंगचेकर (९२.१७), विराज सावंत (९१.८३) व जान्हवी देसाई (९०.३३) यांचा समावेश आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले, अध्यक्षा अॅड. अस्मिता सावंत-भोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, मुख्याध्यापिका प्रियंका देसाई-डिसोजा यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com