लांजा हायस्कूलला ३ लाख २० हजाराची देणगी

लांजा हायस्कूलला ३ लाख २० हजाराची देणगी

३५ (पान ५ साठी)


-rat१३p२२.jpg -
P२४M८३३८४
लांजा ः पालक-शिक्षक संघाकडून लांजा हायस्कूलला देणगी देताना पदाधिकारी.
-------------------

लांजा हायस्कूलला ३ लाख २० हजारांची देणगी

पालक-शिक्षक संघाचा पुढाकार; सीसी टीव्ही कॅमेरे बसवणार

सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १३ ः पालक-शिक्षक संघाकडून लांजा हायस्कूलला सुमारे ३ लाख २० हजार रुपयांची भरीव देणगी प्राप्त झाली आहे. यातून वायरिंगसह सीसीटीव्ही कॅमेरे बनविण्यासाठी २ लाखाचा धनादेश संस्थेकडे सुपूर्द करण्यात आला. वर्गखोल्यांमध्ये १४ पंखे व विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी मिळण्याच्यादृष्टीने ८ अॅक्वाग्रार्ड कंपनीचे पाणी फिल्टर बसविण्यात येत आहेत.
न्यू एज्युकेशन सोसायटी लांजा संचलित न्यू इंग्लिश स्कूल लांजा यथील विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय पाहता पालक-शिक्षक संघाकडून विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी मिळण्याच्यादृष्टीने ८ अॅक्वाग्रार्ड कंपनीचे पाणी फिल्टर व प्रत्येक फिल्टरला स्टिलमध्ये बेसिन लावण्यात येत आहे तसेच टेरेसवरील आठ पत्राशेड असलेल्या रूममध्ये उष्णतेचे प्रमाण पाहून १४ पंखे लावण्याचे काम सुरू आहे. ही सर्व कामे उपाध्यक्ष हंसराज (राजू) सुर्वे व सहसचिव सचिन जाधव पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शाळेच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात वीज पडल्याने संपूर्ण वायरिंग व कॅमेरे हे नादुरुस्त झाले होते. त्यामुळे संस्थेच्यावतीने नवीन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी काही रकमेची मागणी पालक संघाकडे केली होती. त्यानुसार शाळेतील विद्यार्थ्यांचा संरक्षणाचा विचार करून पालक-शिक्षक संघाने २ लाख ५० हजाराचा धनादेश संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव यांच्या हस्ते देण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com