-ओणीतील क्रिकेट स्पर्धेत कर्लेवाडी किंग संघ विजेता

-ओणीतील क्रिकेट स्पर्धेत कर्लेवाडी किंग संघ विजेता

३८ (पान ५ साठी)


-rat१३p२५.jpg-
२४M८३३९१
राजापूर ः क्रिकेट स्पर्धेतील विशेष नैपुण्यप्राप्त खेळाडूंना पारितोषिक देऊन गौरविताना वासुदेव तुळसणकर, गणपत भारती, संजय तुळसणकर.
----------

क्रिकेट स्पर्धेत कर्लेवाडी किंग संघ विजेता

राजापूर, ता. १३ ः तालुक्यातील ओणी-कोंडीवळे येथील सर्वोत्कर्ष सामाजिक संस्था आयोजित ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत यंग बॉईज तिवरे संघावर मात करत कर्लेवाडी किंग संघाने २१ हजार रुपयांसह मानाचा चषक पटकावला. यंग बॉईज तिवरे संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ओणी पंचक्रोशी अध्यक्ष वासुदेव तुळसणकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. या वेळी कार्याध्यक्ष गणपत भारती, उपाध्यक्ष गणपत जानस्कर, सचिव संतोष वडवलकर, रवींद्र जानसकर, सुरेश भारती उपस्थित होते. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून दिनेश तरळ, उत्कृष्ट फलंदाज व मालिकावीर म्हणून संकेत कडू यांना गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वीतेसाठी गणपत भारती, संजय तुळसणकर, प्रसाद मयेकर, अक्षय जानस्कर यांनी विशेष मेहनत घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com