खोपोलीत आंबा बाजार 
तेजीत; हापूसला पसंती

खोपोलीत आंबा बाजार तेजीत; हापूसला पसंती

खोपोलीत आंबा बाजार
तेजीत; हापूसला पसंती

सकाळ वृत्तसेवा
खोपोली, ता. १३ : आंब्याचा हंगाम सुरू झाल्यापासून जून महिन्याच्या मध्यापर्यत खोपोलीतील बाजारपेठेमधील हनुमान मंदिर परिसरात खास आंबा बाजार भरतो. सकाळी पाच वाजल्यापासून साधारण अकरा वाजेपर्यंत येथील आंबा खरेदी-विक्री व्यवहार चालतात. कर्जत, पेण, अलिबाग, राजापूर, रत्नागिरीसहित कर्नाटक हापूस आंबा येथे मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध असतात. यावर्षी अलिबाग व पेण तालुक्यातील वरसई भागातील हापूस व केशर आंबा मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी दाखल होत असून रत्नागिरी पाठोपाठ स्थानिक हापूसला नागरिकांची पसंती मिळत आहे.
येथे आंब्याचे किरकोळ व होलसेल असे दोन दर असतात .त्यातही साईज नुसार दर निश्चित आहेत .कच्च्या आंब्याचे किरकोळ विक्रीसाठी २५० पासून ३५० प्रति डझन तर पिकलेल्या आंब्यासाठी २०० ते ३५० प्रति डझन असे दर आहेत .चार डझन व त्यावरील होलसेल खरेदीसाठी कच्च्या आंब्याचे दर २०० ते ३०० रुपये प्रति डझन तर पिकलेल्या आंब्यासाठी हे दर १५० पासून ३०० प्रति डझन असे आहेत .होलसेल खरेदीसाठी अलिबाग तालुका व पेण तालुक्यातील वरसई भागातील कच्च्या आंब्याला मोठी आवक होत असल्याने खरेदीसाठी नागरिकांचीही पसंती मिळत आहे . मागील आठवड्यापासून येथील हनुमान मंदिर आंबा बाजारात सकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत दररोज आंबा खरेदी व विक्रीसाठी मोठी गर्दी होत असून, या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत आहे.या आंबा बाजारातून होलसेल खरेदी करून स्थानिक गरजू कुटूंब खासकरून महिला वर्ग शहरातील गल्ली गल्ली व रहिवासी सोसायटयांमध्ये जाऊन माफक नफा कमवून आंबा विक्री करतात .या माध्यमातून दोन महिने त्यांना रोजगार उपलब्ध होत असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com