चिपळूणमध्ये ग्रामीण भागात वादळी पाऊस

चिपळूणमध्ये ग्रामीण भागात वादळी पाऊस

४८ ( पान ३ साठी )

-rat१३p३२.jpg-
२४M८३४३४
चिपळूण ः पोफळी येथील महानिर्मितीच्या वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वडाचे झाड कोसळले.
-----------

चिपळुणातील ग्रामीण भागात वादळी पाऊस

पोफळीत वाहतूक कोंडी ; वीज पुरवठा खंडित
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ ः चिपळूण शहर आणि ग्रामीण भागात सोमवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. सायंकाळी अवकाळी पाऊस पडल्याने चिपळूण बाजारपेठेतील मोकळ्या जागेत व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांची तारांबळ उडाली.
चिपळूणमध्ये सोमवारी दुपारपासून पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी वादळी वारा सुटले. यामुळे पावसामुळे महावितरणकडून शहरात वीज पुरवठा खंडित करण्यात आला. सायंकाळी चार वाजता पोफळी परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी झाडाच्या फांद्या कोसळल्या. त्यामुळे महावितरणचा वीज पुरवठा खंडित झाला तो सायंकाळी उशिरापर्यंत सुरळीत झाला नव्हता. ग्रामीण भागाला पावसाचा मोठा तडाखा बसला. पोफळीतील मानकरवाडी पंडववाडीत परिसरात झाडे कोसळली. न्यू इंग्लिश इंग्लिश स्कूलच्या समोरील वडाचे झाड रस्त्यावर कोसळल्यामुळे वाहतूक कोंडी झाली. पोलिस ठाण्यामार्गे कॉलनीकडे जाणारा रस्ता या अपघातानंतर बंद झाला आहे. चिपळूण गुहागर मार्गावर पिंपळी शिरगाव अलोरे परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com