अश्लील संदेश पाठविणाऱ्या
परप्रांतीयास बांद्यात चोप

अश्लील संदेश पाठविणाऱ्या परप्रांतीयास बांद्यात चोप

अश्लील संदेश पाठविणाऱ्या
परप्रांतीयास बांद्यात चोप

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १३ ः बांदा शहरातील स्थानिक दहाहून अधिक मुलींना अश्लील संदेश पाठविणे परप्रांतीय तरुणाच्या अंगलट आले. पालकांसह स्थानिकांनी या तरुणाला बेदम चोप दिला. त्यावेळी त्याच्या मोबाईलमध्ये अनेक मुलींची छायाचित्रे तसेच प्रोफाईल आढळून आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी, की संबंधित २० वर्षीय परप्रांतीय तरुण शहरातील काही तरुणींना समाज माध्यमातील विविध प्लॅटफॉर्मवरून अश्लील संदेश पाठवत होता. काही मुलींना लग्नासाठी मागणी घालत होता, तर काहींना फिरायला जाण्यासाठी आग्रह करत होता. काही मुलींनी याची कल्पना आपल्या पालकांना दिली. आज सकाळी पालकांनी सापळा रचत या तरुणाला संदेश पाठविताना रंगेहात पकडले. यावेळी तरुणाला जाब विचारण्यात आला. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने स्थानिकांनी त्याला बेदम चोप दिला. त्याच्या मोबाईलमधील सर्व मुलींचे मोबाईल नंबर डिलिट करण्यात आले. याबाबत बांदा पोलिसांत तक्रार दाखल नसल्याचे सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com